Join us

'लपंडाव' मालिकेचा प्रोमो समोर; सायली संजीवला चाहत्यांचा प्रश्न, 'चेतनसोबत तू होतीस ना?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:02 IST

मालिकेच्या प्रोमोवर सायलीचीही कमेंट

स्टार प्रवाह वाहिनीवर नवी मालिका येत आहे. 'लपंडाव' असं मालिकेचं नाव आहे. 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसले या मालिकेतून कमबॅक करत आहे. तसंच अभिनेत्री कृतिका देवही मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेता चेतन वडनेसे लीड रोलमध्ये आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो आला. मात्र यावर प्रेक्षकांनी भलत्याच कमेंट्स केल्या. सायली संजीव मालिका करणार होती ना? ती कुठे आहे? असे प्रश्न कमेंट्समध्ये आले आहेत. यामागचं कारण काय वाचा.

मार्च महिन्यात स्टार प्रवाहच्या एका सोहळ्यात अभिनेता चेतन वडनेरे आणि सायली संजीवचा डान्स परफॉर्मन्स होता. स्टार प्रवाह परिवाराशी मी जोडली जात आहे असंही सायली म्हणाली होती. चेतन आणि सायली एका मालिकेत झळकणार हे तेव्हा स्पष्ट झालं होतं. बऱ्याच वर्षांनी सायली टीव्हीवर कमबॅक करणार म्हणून चाहतेही खूश होते. मात्र आता मालिकेचा प्रोमो समोर आला. यामध्ये सायली संजीव नाही तर कृतिका देव लीड रोलमध्ये दिसली. यामुळे अनेकांनी कमेंट्समध्ये 'सायली कुठे आहे?' विचारायला सुरुवात केली.

मालिकेच्या प्रोमोवर सायलीनेही 'अभिनंदन' अशी कमेंट केली आहे. मात्र सायली मालिकेत दिसणार नसल्याने काही चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. सायलीच्या जागी 'आई कुठे काय करते' फेम अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी अभिनेत्री कृतिका देवची वर्णी लागली आहे. 'लपंडाव' ही मालिका लवकरच सुरु होणार आहे. यामध्ये रुपाली तेजस्विनी कामत या भूमिकेत आहे. तर कृतिका तिच्या मुलीच्या सखीच्या भूमिकेत आहे. प्रोमोमध्ये चेतन वडनेरे ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसत आहे. मालिकेची कहाणी काय असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

टॅग्स :सायली संजीवरुपाली भोसलेस्टार प्रवाहमराठी अभिनेताटिव्ही कलाकार