Join us

अखेर रोहिणी-सरोजचं कारस्थान कला सगळ्यांसमोर आणणार? 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत नवा ट्विस्ट; पाहा प्रोमो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:30 IST

सध्या सोशल मीडियावर स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेची तुफान चर्चा होत आहे.

Laxmichya Pavlanni Serial: टीव्हीवर दररोज प्रसारित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनत चालल्या आहेत. मनोरंजनात मालिकांचा मोठा वाटा असल्याचे पाहायला मिळतंय. याशिवाय मालिकांमधील रंजक वळणे प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवत असतात. सध्या सोशल मीडियावर स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेची तुफान चर्चा होत आहे. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे त्यामुळे प्रेक्षक देखील उत्सुक असल्याचे पाहायला मिळतायत. 

दरम्यान, नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत अद्वैत चांदेकरला म्हणजेच कलाच्या नवऱ्याला 'बिझनेसमॅन ऑफ द इयर' पुरस्कार जाहीर झाला असल्याचं दाखवण्यात येत आहे. त्यांच श्रेय अद्वैत त्याची आई सरोजला चांदेकरला न देता पत्नी कलाला देतो. या सगळ्या प्रकारामुळे आता मालिकेत नवं वळण येणार असल्याचं दाखण्यात आलं आहे. कला आणि अद्वैत एकमेकांपासून कायमचे वेगळे व्हावेत या निर्णयावर सरोज पहिल्यापासून ठाम आहे. आता त्यात तिला रोहिणीची साथ मिळाली आहे. त्यामुळे कसंही करून कलाला चांदेकरांच्या घरातून कसं बाहेर काढता येईल यासाठी त्या प्रयत्न करतात. 

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सरोज आणि रोहिणी कलावर केकमध्ये विष घालून अद्वैतला मारण्याचा कट रचल्याचा आरोप करतात. तो केक खाऊन उंदीर मेल्याचं आबांना सांगत त्या कला खोटी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु कला अगदी ठामपणे सासूबाईंनी उत्तर देत आपण असलं काहीच केलं नसल्याचं स्पष्टपणे सांगते. विश्वास नसल्यास पोलिसांनी बोलावून खरं-खोटं करुन घ्या, असंही त्यांना म्हणते. शिवाय अद्वैतदेखील कलाला पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. त्यामुळे सत्याच्या लढाईत कोण जिंकणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता हा भाग केव्हा प्रसारित केला जाणार याची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. 

'स्टार प्रवाह' वाहिनीवर 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका दररोज रात्री ९.३० वाजता प्रसारित केली जाते. या मालिकेला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळते आहे. मालिकेचा भाग हा गुरुवार  फेब्रुवारीच्या दिवशी प्रसारित केला जाणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया