इशितासाठी खास मेजवानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 17:00 IST
रिश्तों का सौदागर बाजीगर या मालिकेत इशिता दत्ता आणि वत्सल सेठ प्रमुख भूमिका साकारत आहेत. इशिता ही आपल्या फिटनेसबद्दल ...
इशितासाठी खास मेजवानी
रिश्तों का सौदागर बाजीगर या मालिकेत इशिता दत्ता आणि वत्सल सेठ प्रमुख भूमिका साकारत आहेत. इशिता ही आपल्या फिटनेसबद्दल सतर्क असली तरी ती तिच्या जीभेवर ताबा ठेवू शकत नाही. तिला पाणीपुरी, समोसा यांसारखे पदार्थ खूप आवडतात. सेटवरच्या सगळ्यांचा डब्बा ती खाते. या मालिकेच्या सेटवर एक मुलगा समोसा विकायला येतो, ते समोसे तर तिचे जीव की प्राण आहेत. इशिताला गोड पदार्थही खूप आवडतात. वत्सलच्या आईलादेखील इशिताचे गोड पदार्थांवरचे प्रेम चांगलेच माहीत आहे. तीदेखील तिला अनेकवेळा श्रीखंड बनवून पाठवते. वत्सलची आई खूपच छान श्रीखंड बनवते. मी त्यांच्या श्रीखंडाची नेहमीच वाट पाहात असते असे इशिता सांगते.