Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मन झालं बाजिंद' मालिकेत लवकरच दिसणार रायाचा नवीन लुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 15:53 IST

'मन झालं बाजिंद' मालिकेतला राया स्वभावाने देखील प्रेमाची उधळण करणारा आहे. 

छोट्या पडद्यावर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका 'मन झालं बाजिंद' प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. मालिकेतील रांगडा नायक आणि सुंदर नायिका यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेता वैभव चव्हाण हा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतोय. कृष्णा आणि राया ही जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे.विशेष म्हणजे मालिकेतला राया हा हळदीच्या कारखान्याचा मालक आहे आणि स्वतःच्या मेहनतीने आणि जिद्दीने राया स्वतःच्या पायावर उभा आहे आणि त्याने नाव आणि सन्मान मिळवला आहे. तो खूप जिद्दी आहे आणि रायाच्या व्यक्तिमत्वावरूनच या मालिकेचं नाव बाजिंद असं पडलं आहे. राया स्वभावाने देखील प्रेमाची उधळण करणारा आहे. 

सालस कृष्णा आणि रांगडा राया प्रेक्षकांना भावले आहेत. रायाचा रांगडा लुक सगळ्यांच्या पसंतीस पडला असून त्याच्यासारखी स्टाईल त्याचे चाहते फॉलो करत आहेत. पण आता मालिकेत रायाचा वेगळा लुक लवकरच रसिकांना पाहायला मिळणार आहे. राया आता शॉर्ट हेअर लुक मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या लुक मधील त्याचा हा खास फोटो. मालिकेत नुकतंच राया आणि कृष्णाच लग्न झालेलं प्रेक्षकांनी पाहिलं आता लवकरच राया या नवीन अवतारात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

या नवीन लुकबद्दल राया म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण म्हणाला, "मी या नवीन लुकसाठी खूपच जास्त एक्सायटेड आहे. मालिकेत खूप घडामोडी घडत आहेत. कृष्णा आणि रायाच लग्न झालं आहे आणि आता पुढे मालिकेत अजून काही ट्विस्ट्स अँड टर्न्स येणार आहेत. त्यामुळे रायाचा हा लुक का बदलला आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल आणि रायाच्या या नवीन लूकवर देखील प्रेक्षक तेवढंच प्रेम करतील याची मला खात्री आहे."रायाचा हा नवीन लुक मधील फोटो पाहून प्रेक्षक देखील त्याच्या लुक चेंजबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतील यात शंकाच नाही.