Join us

असा असेल 'कौन बनेगा करोडपती १२'चा भव्य सेट, अमिताभ बच्चन ७ सप्टेंबरपासून सुरू करणार शूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 16:44 IST

सोनी चॅनलने ३ सप्टेंबरला 'केबीसी १२' च्या नव्या सेटचे फोटो ट्विटरवर शेअर केले आणि सांगितले की, होस्ट अमिताभ बच्चन ७ सप्टेंबरपासून स्पर्धकांसोबत शूटींग सुरू करतील.

आता प्रतिक्षा संपली कारण लवकरच तुमचा आवडता शो 'कौन बनेगा करोडपती १२' ची शूटींग स्पर्धकांसोबत लवकरच सुरू होणार आहे. सोनी चॅनलने ३ सप्टेंबरला 'केबीसी १२' च्या नव्या सेटचे फोटो ट्विटरवर शेअर केले आणि सांगितले की, होस्ट अमिताभ बच्चन ७ सप्टेंबरपासून स्पर्धकांसोबत शूटींग सुरू करतील.

'कौन बनेगा करोडपती'च्या प्रत्येक सीझनमध्ये नवीन थीम केली जाते आणि नवीन टॅगलाइनही केली जाते. यावेळची टॅगलाइन -जो भी हो, सेटबॅक का जवाब कमबॅक से दो', अशी आहे. काही दिवसांपूर्वी चॅनलने या शो चा पहिला प्रोमो रिलीज केला होता. जो नितेश तिवारी आणि निखी महरोत्रा यांनी तयार केला होता. 

शोचं शूटींग सुरू होणार असलं तरी कौन बनेगा करोडपती १२ च्या दोन क्रू मेंबर्सचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सेटवर एक गोंधळ उडाला आहे. शो चं शूटींग पूर्ण सुरक्षा आणि काळजी घेऊन सुरू होती. तरी सुद्धा कोरोनाने दोन सदस्यांना आपल्या जाळ्यात घेतलं. तेच होस्ट अमिताभ बच्चन हे सुद्धा काही दिवसांपूर्वीच कोरोनातून बरे होऊन शूटवर परत आले होते.

हे पण वाचा :

'Bigg Boss 14': राधे माँसह 'हे' प्रसिद्ध कलाकार दिसणार घरात, वाचा संपूर्ण लिस्ट

सुनिल ग्रोवर - शिल्पा शिंदेच्या वादावर शोच्या निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण, शिल्पाला शोमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू

बाबो ! राधे माँ घेणार बिग बॉसच्या घरात एंट्री, यासाठी देण्यात आली तगडी रक्कम

 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन