Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनी मॅक्स 2च्या टाईमलेस डिजीटल अवॉर्ड्स सीझन 3 ला तीन आठवड्यात मिळाली पाच लाखांपेक्षा अधिक मते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 13:42 IST

पहिल्या दोन हंगामात चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, सोनी मॅक्स 2 भारतातील पहिलाच ऑनलाईन चित्रपट पुरस्कार ‘टाईमलेस डिजीटल अवॉर्ड्स’चे तिसरे पर्व ...

पहिल्या दोन हंगामात चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, सोनी मॅक्स 2 भारतातील पहिलाच ऑनलाईन चित्रपट पुरस्कार ‘टाईमलेस डिजीटल अवॉर्ड्स’चे तिसरे पर्व घेऊन परत आले आहे. यावेळी ५० आणि ६० च्या दशकातील ‘सदाबहार’ हिंदी चित्रपटातील आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. हिंदी चित्रपटाच्या या अप्रतिम दशकातील आपल्या आवडत्या कलाकारांकरिता चाहत्यांनी केलेल्या मतांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचा अनुभव मॅक्स 2 ला येत आहे. मागील दोन वर्षांची संख्या पाहता, या हंगामात त्यांच्या आवडत्या कलाकारांकरिता ५.४ लाख चाहत्यांनी मत दिले आहे.

सदाबहार युग आणि नव्या तंत्रज्ञानाला एकत्रित करणाऱ्या सोनी मॅक्स 2 ने या नव्या प्रयत्नांमुळे देशातील हिंदी चित्रपट प्रेमींना त्यांचे ‘सदाबहार’ आवडते कलाकारांना जिंकून देण्यासाठी मायक्रोसाईटवर जोडून घेतले आहे. प्रेक्षकांना आपल्या घरांमध्ये आरामात सिनेमे पाहता यावेत यासाठी ही वाहिनी अनेक दर्जेदार चित्रपट दाखवत आहे. शिवाय, डिजीटल उपक्रमामुळे तरुण पिढीलाही या सिनेमांशी जोडता येणार आहे. आधीचे युग आणि आधुनिक युग याचा योग्य मेळ म्हणजे टाईमलेस डिजीटल अवॉर्ड्स. भारताचा कलात्मक अभिमान आणि तरूणाईतील बंध उत्कृष्ट पद्धतीने यात जपले गेले आहेत. टाईमलेस डिजीटल अवॉर्ड्समध्ये ५० आणि ६० च्या दशकातील त्यांचे आवडते कलाकार निवडण्यासाठी एक खास विभाग आहे. अनेकविध श्रेणींमधून ‘सदाबहार अभिनेता’ आणि ‘सदाबहार अभिनेत्री’ या दोन श्रेणींना जास्त मतदान मिळाले आहे आणि यामध्ये देव आनंद, दिलीप कुमार, मधुबाला आणि राज कपूर या अभिनत्यांना जास्त मतं मिळाली आहेत. त्या दशकातील जादू कधीही विरणार नाही हेच हिंदी चित्रपट चाहत्यांनी यातून सिद्ध केले आहे.

सदाबहार वॉल ऑफ फेम कोण आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा -
https://max2awards.sonyliv.com/