Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन आयडलचा प्रोमो पाहून बेसूरो की टोली आ गई असे म्हणत सोनू कक्करला नेटिझन्सना सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 13:36 IST

बेसूरो की टोली आ गई असे म्हणत नेटिझन्सने सोनू आणि सवाईला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

इंडियन आयडल या कार्यक्रमाचा हा सिझन चांगलाच वादात अडकला आहे. कधी स्पर्धकांच्या आवाजामुळे तर कधी या कार्यक्रमावर परीक्षकांनी केलेल्या वादामुळे हा कार्यक्रम चर्चेत येतो. आता या भागात सोनू कक्कर आणि शब्बीर कुमार बतौर प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून हा प्रोमो पाहून नेटिझन्स या कार्यक्रमाला ट्रोल करत आहेत.

इंडियन आयडलचा हा भाग इंडिया की फर्माईश असा असून स्पर्धक लोकांच्या आवडीची गाणी गाणार आहेत. सवाई भट्ट या प्रोमात तुने क्या कर डाला... हे गाणे गाताना दिसत आहे. त्यानंतर सवाई मला तुमच्यासोबत गाणे गायचे आहे असे सोनू कक्करला सांगताना दिसत आहे. त्यावर सोनू स्टेजवर येऊन नुसरत फतेह अली यांचे मेरे रश्के कमर गाताना दिसत आहे. हे गाणे ऐकून नेटिझन्सने चांगलेच सुनावले आहे.

बेसूरो की टोली आ गई असे म्हणत नेटिझन्सने सोनू आणि सवाईला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. चांगल्या गाण्याची देखील तू वाट लावलीस असे देखील त्यांना सुनावले आहे.

टॅग्स :इंडियन आयडॉल