Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कुछ रंग प्यार के ऐसे भी मालिकेत लीपनंतर होणार सोनाक्षी आणि देवचा मेकओव्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 10:18 IST

मालिकांमध्ये लीप घेण्याचा ट्रेंड काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मालिकांमध्ये अनेक वर्षांचा लीप घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता ...

मालिकांमध्ये लीप घेण्याचा ट्रेंड काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मालिकांमध्ये अनेक वर्षांचा लीप घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता कुछ रंग प्यार के ऐसे भी ही मालिका लवकरच लीप घेणार आहे. या मालिकेत सात वर्षांचा लीप घेतला जाणार आहे. या मालिकेतील देव आणि सोनाक्षीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. पण लीपनंतर ते दोघे एकमेकांपासून दूर राहात असल्याचे दाखवण्यात येणार आहे. लीपनंतर या मालिकेत देवची भूमिका साकारणारा शाहीर शेख आणि सोनाक्षीच्या भूमिकेत असलेली एरिका फर्नांडिस प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहेत. या दोघांचाही मेकओव्हर होणार असून त्यांचा लूक खूपच वेगळा असणार आहे. लीपनंतर मालिकेच्या कथानकालादेखील मोठी कलाटणी मिळणार आहे. लीपनंतर सोनाक्षी आणि देव यांचा घटस्फोट झाल्याचे दाखवण्यात येणार आहे आणि घटस्फोटानंतर ते दोघेही आपापले आयुष्य आपापल्यापरिने जगणार आहेत. एकमेकांवर प्रचंड प्रेम करणाऱ्या सोनाक्षी आणि देवला ते दोघे आता कुठे असतात, काय करतात याचीदेखील कल्पना नसणार आहे. सोनाक्षी तिच्या मुलीसोबत कोलकाता येथे राहायला जाणार आहे. ती खूप चांगल्याप्रकारे आपल्या मुलीचा सांभाळ करणार आहे. तसेच ती एक प्रसिद्ध उद्योजिका बनणार आहे तर दुसरीकडे नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करणारा देव आता स्वतःचे आयुष्य स्वतंत्रपणे जगू लागला आहे. मालिकेत प्रेक्षकांना आता देवची प्लेबॉय इमेज पाहायला मिळणार आहे. या सगळ्यामुळे देवची आई इश्वरी चांगलीच खचणार आहे आणि देवच्या सध्याच्या परिस्थितीसाठी ती सोनाक्षीलाच जबाबदार समजणार आहे.