Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीमध्ये शो अन् भर एअरपोर्टवर प्रियंका चोप्रा म्हणालेली असं काही...; अभिजीत सावंतने सांगितला 'तो' प्रसंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:28 IST

"तू तर आमच्यापेक्षा...", अभिजीत सावंतचा परफॉर्मन्स पाहून प्रियंका चोप्रा म्हणालेली असं काही...; किस्सा शेअर करत म्हणाला...

Abhijeet Sawant : आपल्या सुरेल स्वरांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारा मराठमोळा गायक म्हणजे अभिजीत सावंत (Abhijeet Sawant).  'सर सुखाची श्रावणी', 'मोहबत्ते लुटाउॅंगा' अशा गाण्यांमुळे अभिजीत सावंत हे नाव घराघरात पोहोचलं. फक्त संगीताची जादूच नाहीतर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातही सहभागी होऊन त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या पर्वाचा तो उपविजेता ठरला. सध्या अभिजीत एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अलिकडेच अमोल परचुरेंच्या 'कॅचअप मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत सावंतने प्रियंका चोप्राचा किस्सा शेअर केला. तो किस्सा शेअर करताना अभिजीत म्हणाला, मला आठवतंय दिल्लीमध्ये एकदा आमचा एक शो होती. ती एक स्टार नाईट होती. तेव्हा शाहरुख खान, प्रियंका चोप्रा असे कलाकार तिथे होते.तर झालं असं की, खान साहेब शो संपल्यावर त्यांच्या वेगळ्या फ्लाईटने गेले. पण,धुक्यामुळे आम्ही विमानतळावरच अडकलो. त्यात प्रियंका चोप्रा, राणी मुखर्जी असे सगळे कलाकार आम्ही तिथे अडकलो होतो. त्यावेळी आम्ही एकाच रुममध्ये बसून होतो... कारण आमची फ्लाईट ३-४ तास उशीरा होती.

त्यानंतर अभिजीत म्हणाला, रुममध्ये असताना आमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या विषयावर गप्पा सुरु होत्या. तेव्हा मला प्रियंका चोप्रा म्हणाली, अरे... यार तू तर आमच्यापेक्षा जास्त फेमस आहेस. तू गाणे गाताना लोक तुला मोठ्या प्रमाणात चिअर करत होते. एवढं चिअर तर आम्हालाही कोणी करत नाही. पण, तसं काहीच नव्हतं... असं मी तिला सांगितलं. 

मग अभिजीत म्हणाला, "आपल्या समाजाला  अशी एक सवय असते की जो आपल्यापेक्षा पुढे जातो. त्याच्याकडे नकारात्मकतेने बघायचं.अरे... हा एवढा मोठा कसा झाला. असं लोकं विचार करतात. खरंतर, ही कौतुक करण्याची गोष्ट आहे. पण, लोक कौतुक त्यांचंच करतात जे आपल्यापेक्षा मानान कमी असतात. यामध्ये झगडणं, पुढे जाऊन स्वत:ला सिद्ध करावं लागतं." 

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Chopra's airport compliment to Abhijeet Sawant revealed in Delhi show memory.

Web Summary : Abhijeet Sawant shared a story about a Delhi show where Priyanka Chopra complimented his popularity. Stuck at the airport due to fog, Chopra noted Sawant's enthusiastic audience reception, highlighting societal tendencies to view success negatively.
टॅग्स :अभिजीत सावंतप्रियंका चोप्रासेलिब्रिटी