Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीआयडी मालिकेतील या कलाकाराचा लवकरच होणार घटस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 16:15 IST

सीआयडी या मालिकेतील एका प्रसिद्ध कलाकाराचा लवकरच घटस्फोट होणार असल्याची चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये रंगली आहे.

ठळक मुद्देमेघा आणि सिद्धांत यांच्या लग्नाला केवळ तीन वर्षं झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असल्याची चर्चा रंगली आहे.

छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध कपल लवकरच वेगळे होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. हे कपल दुसरे कोणीही नसून मेघा गुप्ता आणि सिद्धांत कर्णिक आहे. 

मेघा गुप्ताने आजवर कुमकुम, काव्यांजली यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता सीआयडी या मालिकेमुळे मिळाली. मेघा सध्या तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा तिच्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. तिने 2016 मध्ये सिद्धांत कर्णिकसोबत लग्न केले होते. सिद्धांत हा देखील अभिनेता असून त्याने मेरे साई, रिमिक्स, एक था राजा एक थी रानी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 

मेघा आणि सिद्धांत यांच्या लग्नाला केवळ तीन वर्षं झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असल्याची चर्चा रंगली आहे. ते दोघेही सुरुवातीला सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असायचे. पण डिसेंबर 2018 पासून त्यांनी एकही एकत्रित फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेला नाहीये. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार सिद्धांतने त्यांच्या नात्याविषयी बोलण्यास नकार दिला. केवळ त्याने एवढेच म्हटले की, ज्या प्रकारचा अंदाज लावण्यात येत आहे तसे काहीच घडलेले नाहीये तर याबाबत बोलण्याविषयी माझ्याकडे काहीही नाही असे मेघाने म्हटले आहे. 

मेघाचे हे दुसरे लग्न असून तिचे पहिले लग्न आदित्य श्रॉफ या दिग्दर्शकासोबत झाले होते. आदित्यसोबत लग्न करण्याआधी मेघा अभिनेता नमन शॉ सोबत नच बलिये मध्ये झळकली होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान नमनसोबत नात्यात असल्याने मेघाने कबूल केले होते. पण या कार्यक्रमानंतर लगेचच ती आदित्यला डेट करू लागली. चार वर्षांच्या नात्यानंतर त्या दोघांनी लग्न केले. सिद्धांत आणि मेघाने 2016 च्या सप्टेंबरमध्ये धुमधडाक्यात लग्न करणार होते. पण मेघाच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांनी 16 ऑगस्ट 2016 ला रजिस्टर पद्धतीने लग्न केले. 

 

टॅग्स :सीआयडी