Join us

म्हणून श्वेता तिवारीची मुलगी पलकने इस्टाग्रामला केले ‘गुडबाय’! अकाऊंट केले डिलीट, चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 19:07 IST

पलक तिवारीचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली.

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असायची.आपले फोटो आणि व्हिडीओंमुळे ती सतत चर्चेत होती. पलक तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे नेटीझन्सचे लक्ष वेधून घ्यायची. तिचे अनेक फॉलोअर्स होते. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे पलकचाही बोलबाला असायचा. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत होती.तिचे  सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली.

मात्र यापुढे इन्स्टाग्रामवर पलक तिवारीची एकही पोस्ट दिसणार नाही.पलकने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे. त्यामुळे इन्स्टावर आता तिची कोणतीच पोस्ट तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार नाहीत. पलकने आई- वडिलांच्या वादामुळेच इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्याचे बोलले जात आहे. 

श्वेता तिवारीचे वैयक्तिक आयुष्य गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरतंय.श्वेता तिवारी आणि तिचा घटस्फोटित पती अभिनव कोहली यांच्यातील वाद वारंवार समोर येत असतात. अभिनव आणि श्वेता यांचा वाद आता जगजाहीर झाला आहे. या दोघांच्या वादाचा फटका पलक तिवारीलाही सहन करावा लागत असावा.

सोशल मीडियावर श्वेता आणि अभिनवमुळे पलकलादेखील अनेकदा नाहक त्रास सहन करावा लागत होता.अखेर तिने इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करत सोशल मीडियापासून दूर जाणेच पसंत केले आहे.पलकने विवेक ओबेरॉयसोबत रोझी सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल रंडन मिश्रा यांनी केलं होतं. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे.

टॅग्स :श्वेता तिवारी