Join us
Daily Top 2Weekly Top 5

HOTNESS ALERT:  श्वेता तिवारीचे चाहते असाल तर व्हिडीओ पाहाच...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 14:37 IST

टेलिव्हिजन विश्वात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिच्या ‘हम तुम अ‍ॅण्ड देम’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

ठळक मुद्देश्वेता तिवारी काही दिवसांपूर्वी तिचा दुसरा पती अभिनव कोहलीसोबतच्या वादामुळे चर्चेत होती.

टेलिव्हिजन विश्वात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिच्या ‘हम तुम अ‍ॅण्ड देम’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजमध्ये श्वेताने कधी नव्हे इतके बोल्ड सीन्स दिले आहेत. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरमधील श्वेताचा बोल्ड अवतार पाहून अनेकांना धक्का बसला होता. या ट्रेलरमध्ये श्वेता अनेक लिपलॉक सीन्स देताना दिसली होती. आता या वेबसीरिजचे एक गाणे रिलीज झाले आहे. कुछ इस तरह, असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे पाहूनही अनेकांना धक्का बसेल. होय, कारण या गाण्यातही श्वेता  प्रचंड बोल्ड अवतारात दिसतेय.

अक्षय ओबेरॉयसोबतचा तिचा रोमॅन्टिक अंदाजही पाहण्यासारखा आहे. एकता कपूरच्या या वेबसीरिजमध्ये श्वेता सिंगल  पॅरेन्टची भूमिका साकारत आहे. तिला तिच्याच वयाच्या व्यक्तीशी प्रेम होते. मात्र श्वेता एका मुलीची आई असते तर तिचा प्रियकर स्वत: तीन मुलांचा बाप असतो.

अभिनेत्री श्वेता तिवारी काही दिवसांपूर्वी तिचा दुसरा पती अभिनव कोहलीसोबतच्या वादामुळे चर्चेत होती. आता श्वेता व अभिनव दोघेही विभक्त झाले आहेत आणि श्वेता आपल्या दोन्ही मुलांना एकटी सांभाळते आहे. यादरम्यान श्वेता नव्या दमाने छोट्या पडद्यावर परतली आहे.  ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेत ती  दिसते आहे. शिवाय ‘हम तुम अ‍ॅण्ड देम’ च्या निमित्ताने डिजिटल जगातही तिचा डेब्यू झाला आहे. अल्ट बालाजीची ही वेबसीरिज उद्या 6 डिसेंबरला प्रदर्शित होतेय.

 

श्वेता तिवारी या डिजीटल माध्यमात प्रथमच पदार्पण करत आहे. याच वेबसिरीजचे पहिले गाणं नुकतेच रिलीज झाले असून त्यात तिचा वेगळाच अंदाज बघायला मिळणार आहे.

टॅग्स :श्वेता तिवारी