Join us

शुभांकर एकबोटे-अमृताची लगीनघाई! ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात बांधणार लग्नगाठ, केळवणाचे फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 13:54 IST

अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभांकर एकबोटे यांची लगीनघाई सुरू आहे. नुकतंच अमृता आणि शुभांकरचं केळवणही पार पडलं.

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडबरोबरच मराठी सिनेसृष्टीतही सनई चौघडे वाजत आहेत. प्रथमेश परब, पूजा सावंत, तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके, योगिता चव्हाण-सौरभ चौघुले यांच्या पाठोपाठ मराठी कलाविश्वात लोकप्रिय कपल बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभांकर एकबोटे यांची लगीनघाई सुरू आहे. 

काही दिवसांपूर्वीच अमृता आणि शुभांकर यांचा साखरपुडा पार पडला. आता लवकरच ते लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. त्या दोघांच्याही घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. नुकतंच अमृता आणि शुभांकरचं केळवणही पार पडलं. याचा व्हिडिओ अमृताने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. "तुम्हाला अत्यंत आनंद कधी झाला आहे का? मला वाटतं मी त्याचा अनुभव घेत आहे..." असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. 

अमृता बने आणि शुभांकर सन मराठी वाहिनीवरील 'कन्यादान' या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेत ते नवरा-बायकोच्या भूमिकेत आहेत. आता खऱ्या आयुष्यातही अमृता आणि शुभांकर लग्नगाठ बांधून पती पत्नी होणार आहेत. ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याने चाहतेही खूश आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेतासेलिब्रेटी वेडिंग