Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘कुल्फीकुमार बाजेवाला’च्या चित्रीकरणाच्यावेळी श्रृती शर्माला आली चक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 14:09 IST

‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या आगामी मालिकेतील निम्रतची भूमिका ही आपल्या कारकीर्दीतील आजवरची सर्वात आव्हानात्मक भूमिका आहे, असे अभिनेत्री ...

‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या आगामी मालिकेतील निम्रतची भूमिका ही आपल्या कारकीर्दीतील आजवरची सर्वात आव्हानात्मक भूमिका आहे, असे अभिनेत्री श्रृती शर्माचे मत आहे. अलीकडेच मालिकेतील एका भावनाप्रधान प्रसंगाचे चार तास चित्रीकरण केल्यानंतर तिला सेटवरच चक्कर आली.
‘कुल्फीकुमार बाजेवाला’ ही एका सात वर्षांच्या कुल्फी (आकृती शर्मा) नावाच्या मुलीची संगीतमय कथा आहे. या मालिकेच्या एका प्रसंगाचे चित्रीकरण अलीकडेच वाई येथे सुरू होते. त्यावेळी तापमान तब्बल ४० अंश सेल्सिअसवर गेले होते. या भावनाप्रधान प्रसंगाच्या चित्रीकरणानंतर श्रृती शर्माला श्वासोच्छवास घ्यायला त्रास होऊ लागला आणि ती सेटवरच भोवळ येऊन कोसळली. याविषयी श्रृती शर्मा सांगते, “मी साकारत असलेल्या निम्रतच्या व्यक्तिरेखेला अनेक पैलू असून ती आव्हानात्मक भूमिका आहे. एका भावनाप्रधान प्रसंगासाठी मला तब्बल चार तास रडायचे होते. या प्रसंगात मी इतकी गुंतून गेले होते की, मी भावनाविवश झाले हे मलाच कळले नाही आणि शेवटी मला चक्कर आली आणि मी खाली कोसळले.” 
श्रृतीला चक्कर आल्यानंतर तिला तात्काळ सावलीत नेण्यात आले आणि तिला शुद्धीवर आणण्यात आले. श्रृती सांगते, “चित्रीकरण करण्यात मी इतकी गुंतून गेली होती की, मी उन्हात चित्रीकरण करत आहे याची मला जाणीवच झाली नाही. प्रचंड तापमान असल्यानेच मला चक्कर आली. पण काहीही असले तरी मी ते दृश्य खूप चांगल्या प्रकारे दिले याचा मला आनंद होत आहे.
१९ मार्चपासून ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे. कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेत श्रृतीसोबतच अंजली आनंद, पल्लवी राव, मेहुल बुच असे अनेक नामवंत कलाकार प्रेक्षकांना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेसाठी काही गाण्यांची खास निर्मिती देखील करण्यात आली आहेत. तसेच या मालिकेद्वारे इक्बाल खान, अपरा मेहता हे कलाकार देखील छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.

Also Read : कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेसाठी आकृती शर्माने एका आठवड्यात पाठ केली आठ गाणी