Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुंदरी' मालिकेत धक्कादायक वळण, सुंदरी आणि धनंजयचा होणार अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 16:31 IST

Sundari : 'सुंदरी' मालिका आता वेगळ्या टप्प्यावर आले आहे आहे. आतापर्यंत या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आले आणि मालिकेच्या कथेने प्रेक्षकांना स्वत:शी जोडून ठेवले.

सन मराठी वरील सुंदरी मालिका आता वेगळ्या टप्प्यावर आले आहे आहे. आतापर्यंत या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आले आणि मालिकेच्या कथेने प्रेक्षकांना स्वत:शी जोडून ठेवले. आता पुन्हा एकदा या मालिकेत अशी घटना घडणार आहे ज्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न आपसूक प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होईल. येत्या २७ मे रोजी रात्री ९:३० वाजता 'प्रेमास रंग यावे' आणि 'सुंदरी' या मालिकांचा महासंगम घडणार आहे. 

सुंदरी मालिकेत सुंदरी आणि सुंदर अक्षराच्या बहिणीच्या सुरक्षिततेसाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून तिला शोधण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचा हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील येणाऱ्या संकटाला आमंत्रण देत आहे याची त्याना कल्पनाच नसते. अक्षराच्या बहिणीची सुरक्षा करण्याचा निर्णय त्यांच्याच जीवावर बेतावा म्हणून अश्विन त्यांचा अपघात घडवण्याच्या तयारीत असतो आणि दुर्देवाने त्याच्या प्रयत्नाना यश येऊन सुंदरी, धनजंय आणि सुंदर यांचा अपघात होतो. या अपघातात कोण वाचणार आणि कोणाचा जीव जाणार हे महासंगम विशेष भागात पाहायला मिळेल. 

या अपघातामुळे मालिका कोणत्या वळणावर पोहचणार, या संकटातून बाहेर निघायचा मार्ग काय असेल आणि कसा असेल हे सगळं जाणून घेण्यासाठी 'प्रेमास रंग यावे' आणि 'सुंदरी'चा महासंगम २७ मे सोमवारी रात्री ९:३० वाजता सन मराठीवर पाहावे लागेल.