मागच्या बाजूने येत त्याने हिनाचे जोरात केस ओढले. त्यामुळे हिना जोरात किंचाळली. ही संपूर्ण घटना कॅमेºयात कैद झाली असून, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हिनाच्या चाहत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्या व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी मागणीही काही चाहत्यांनी व्यक्त केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून चाहते त्यांचा संताप व्यक्त करीत आहेत.}}}} ">Some one pulled hina khan hairsThis is wrong ... #BB11pic.twitter.com/dGyqvC0Gsg— Woopxat. (@woopxat) January 5, 2018
Shocking : ड्रामा क्वीन हिना खानसोबत मॉलमध्ये असभ्य वर्तन; व्हिडीओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 22:32 IST
बिग बॉस हा शो अंतिम टप्प्यात पोहोचला असून, शोमधील काही स्पर्धक लाइव्ह वोटिंगसाठी मॉलमध्ये पोहोचले असता, त्यांच्याशी असभ्य वर्तन झाल्याचे समोर आले आहे.
Shocking : ड्रामा क्वीन हिना खानसोबत मॉलमध्ये असभ्य वर्तन; व्हिडीओ व्हायरल!
टीव्ही जगतातील सर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस-११ अंतिम टप्प्यात असून, शोच्या सेमी फायनलला सुरुवात झाली आहे. अशात शोमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी निर्मात्यांनी शोमधील काही स्पर्धकांना त्यांच्या चाहत्यांसमोर नेले असता स्पर्धकांना वाईट अनुभवाचा सामना करावा लागला. होय, बिग बॉसची स्पर्धक ड्रामा क्वीन हिना खान वाशी येथील इनआॅर्बिट मॉलमध्ये दाखल झाली असता, तिच्याशी एका चाहत्याने असभ्य वर्तन केल्याचे समोर आले आहे. याबाबतचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या हिना खान, विकास गुप्ता, शिल्पा शिंदे आणि लव त्यागी हे चार स्पर्धक घराबाहेर जाऊन लाइव्ह वोटिंग करताना दिसले. या चारही स्पर्धकांनी वाशी येथील इनआॅर्बिट मॉलमध्ये एन्ट्री केली आणि त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र त्याचदरम्यान मॉलमध्ये असा काही प्रकार घडला की, सर्वांनाच त्याचा धक्का बसला. मॉलमध्ये उपस्थित असलेल्या एका चाहत्याने हिनासोबत असभ्य वर्तन केले. या चाहत्याने हिनाचे केस ओढण्याचा प्रयत्न केला.