Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कोई लौट के आया है या मालिकेसाठी शोएब मलिकने केले 20 किलो वजन कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2017 13:15 IST

कोई लौट के आया है या मालिकेची प्रेक्षकांना कित्येक दिवसांपासून उत्सुकता लागलेली आहे. या मालिकेत प्रेक्षकांना अद्भूत कथा पाहायला ...

कोई लौट के आया है या मालिकेची प्रेक्षकांना कित्येक दिवसांपासून उत्सुकता लागलेली आहे. या मालिकेत प्रेक्षकांना अद्भूत कथा पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत सुरभी ज्योती आणि शोएब मलिक प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. हे दोघेही या मालिकेसाठी खूपच उत्सुक आहेत. या मालिकेतील भूमिकेसाठी शोएब तर सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. शोएब मलिकने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण गेल्या चार वर्षांपासून तो छोट्या पडद्यापासून दूर होता. पण आता कोई लौट के आया है या मालिकेद्वारे तो कमबॅक करणार आहे. या मालिकेत तो साकारत असलेली भूमिका ही त्याच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे तो या भूमिकेसाठी सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. कोई लौट के आया है या मालिकेत शोएब एका सैनिकाची भूमिका साकारणार आहे. छोट्या पडद्यावर सैनिकाची भूमिका साकारण्याची शोएबची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सैनिकाप्रमाणे शरीरयष्ठी बनवण्यासाठी त्याने अनेक दिवसांचे डाएट केले असून खूप सारे वर्कआऊटदेखील केले आहे. शोएब मार्शल आर्टसचा चाहता आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी या सगळ्या गोष्टी शिकणे त्याने एन्जॉय केले. शोएबने गेल्या काही महिन्यांमध्ये 20 किलो वजन कमी केले आहे. सैनिकाप्रमाणे दिसण्यासाठी तो रोज दोन तास तरी व्यायाम करत असे आणि आता तर त्याने मेहनत घेऊन सिक्स पॅक्स अॅब्स बनवले आहेत. शोएब आता एकही दिवस व्यायाम केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे तो सुट्टीच्या दिवशीदेखील, तसेच हॉलिडेवर असतानादेखील न चुकता व्यायाम करतो.