Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवानी सुर्वेचं प्राणीप्रेम, तिच्याकडे आहेत ३ गोजिरवाण्या मांजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 07:15 IST

शिवानीने आपल्या मांजरांच्या मस्तीचे किस्सेही ह्या व्हिडीओत सांगितले आहेत. बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदरही तिने आपल्या मांजरांविषयीचा एक व्हिडीओही रेकॉर्ड केला आहे.

जगभरात सर्वत्रच  (International Cat Day)  साजरा केला जातो. बिग बॉस कंटेस्टंट आणि अभिनेत्री शिवानी सुर्वेला  मांजरं खूप आवडतात. तिच्याकडे तीन गोंडस मांजरी आहेत. ही तीनही मांजरं तिच्या कुटूंबांचा एक महत्वपूर्ण हिस्सा आहेत. आणि ह्या छोटुकल्या कुटूंबियांना शिवानी बिग बॉसच्या घरात सध्या किती मिस करतेय, ते तिने काही दिवसांपूर्वीच बिग बॉसमधल्या अनसीन अनदेखा व्हिडीयोमध्ये सांगितलं आहे.तिने ह्या व्हिडीयोत सांगितलंय, की “माझ्या घरी पहिला तपकिरी रंगाचा बोका आला. ज्याचं नाव आम्ही ब्रुनो ठेवलं. त्यानंतर काळी-पिवळी, तपकिरी रंगाची मांजर आली . तिचं नाव माझ्या  आईने सखी ठेवलं. आणि नंतर पांढरी शुभ्र रंगाची मांजर आली. तिचं नाव स्नो आहे. गेम ऑफ थ्रोन्स मधला जॉन स्नो पाहून मी त्या मांजरांच नाव स्नो ठेवलं. प्रत्येक मांजराचे स्वभाव-आवाज वेगवेगळे आहेत. आणि तिघंही माझी खूप लाडकी आहेत.”

शिवानीने आपल्या मांजरांच्या मस्तीचे किस्सेही ह्या व्हिडीओत सांगितले आहेत. बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदरही तिने आपल्या मांजरांविषयीचा एक व्हिडीओही रेकॉर्ड केला आहे. ती आपल्या मांजरांच्या आठवणी सांगते, “माझी तिनही मांजरं माझ्या प्रत्येक प्रोजेक्टच्या सेटवरही आली आहेत. मग ते मुंबई असो की पुणे, माझ्या प्रत्येक आउटडोअर सेटवर माझी मांजरं आली आहेत.  पण बिग बॉसच्या शोचा फॉर्मेटच वेगळा असल्याने मी त्यांना माझ्यासोबत आणू शकले नाही. त्यामूळे त्यांना आता मी मिस करतेय.”

तसेच कलाकार आणि त्यांच्या फॅन्सचं एक वेगळच नातं असतं. बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वामधील स्पर्धक शिवानी सुर्वे हिचा एक जबरा फॅन आहे. ह्या फॅनने ‘शिवानी स्टाईल’ नावाचा स्टिकर त्याच्या गाडीवर लावला आहे. निनाद म्हात्रे असं ह्या जबरा चाहत्याचं नाव असून, हा रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये राहणारा आहे.शिवानी सुर्वे हिने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये अभिनेय केला आहे. तिची हिंदी टेलिव्हिजन मालिका ‘जाना ना दिल से दूर’ इंडोनेशियामध्ये सध्या टेलिकास्ट होत असल्याने शिवानीचे जगभरामध्ये फॅन्स आहेत. काही काळापूर्वी तिने गुगल सर्चमध्ये महेश मांजरेकरांनाही मागे टाकले होते.