'तारिणी' मालिकेमधून अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) एक वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तारिणी बेलसरे हे मुंबईत राहणारी अंडरकव्हर कॉप आहे जी आपल्या आईचं सत्य आणि खऱ्या गुन्हेगाराला जगापुढे आणायचं म्हणून पोलिसात भरती होते. तारिणी बद्दलच्या काही गोष्टी शिवानीने शेअर केल्या.
शिवानी सोनार म्हणाली की, "सर्वात आधी तर प्रेक्षकांचे आभार की ते तारिणीला इतकं प्रेम देत आहेत. तारिणीच्या प्रोमो शूटचा पहिल्या दिवसापासून आम्ही अॅक्शन सीन शूट करत आहोत. मला लक्षात आहे पाहिलं प्रोमो शूट जिथे मी नववारी साडीमध्ये अॅक्शन सीन शूट केला. खूप आव्हानात्मक होतं ते शूट करणं. आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि तो प्रोमो पूर्ण केला. पण प्रोमो शूटच्या त्या रात्री मी अॅक्शन शॉट देताना धडपडले. तो सीन म्हणजे जिथे मला गुंडाला लाथ मारायची असते आणि धावायचं असते, तर धावताना माझा बूट अडकतो आणि मी पडते. माझ्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. अजूनही तो खांदा रिकव्हर होत आहे. मी माझ्या मनाची तयारी केली आहे कारण मालिकेच नावच तारिणी आहे तेव्हा अॅक्शन सीन सारखे होणारच, आणि किती ही काळजी आणि सतर्कता पाळली तरीही अॅक्शन म्हंटल कि लागणपडणं होतंच."
माझी या भूमिकेसाठी निवड अशी झाली, मला प्रोडक्शन हाऊस मधून कॉल आला होता झी मराठी एक मालिका करत आहे. तुला ऑडिशन द्यायला आवडेल का आणि मी पहिले एकटीने ऑडिशन दिली. मग मालिकेच्या हिरोच्या भूमिकेसाठी ऑडिशन होतं. नंतर त्यांच्या सोबत ही लूक टेस्ट दिली आणि तारिणी, केदारची जोडी फायनल झाली. तयारीबद्दल सांगायचे झाले तर सर्वात आधी अशा भूमिका खूप कमी लिहल्या जातात खास करून महिला पात्रांसाठी आणि ती साकारायची मला संधी मिळाली याचा खूप आनंद आहे. जेव्हा मला कॉल आला तेव्हा मी घरीच होते आणि मी सर्वांसोबत ही बातमी शेअर केली, सर्व खुश झाले. माझी झी मराठी रोबर ही पहिली मालिका असणार आहे, या आधी मी 'उंच माझा झोका' अवॉर्ड शोच सूत्रसंचालन केले होते. तेव्हापासून मॅनिफेस्ट केलेली गोष्ट आहे जी आता पूर्ण झाली आहे. मला टीम ही तितकीच छान मिळाली आहे, असे शिवानी म्हणाली.