मराठी हिंदू नववर्षातला पहिला सण गुढीपाडवा गुरुवारी मोठ्या थाटामाटात सर्वत्र साजरा केला गेला. सेलिब्रिटींनीही गुढी उभारत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. अनेक सेलिब्रिटींनी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नवीन घर आणि गाडी घेतल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. आता आणखी एका अभिनेत्याने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेता शिव ठाकरेने ही बातमी चाहत्यांना दिली आहे.
शिव ठाकरेने अमरावतीमध्येच स्वत:चे सलून सुरू केले आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नुकतेच त्याने सलूनचे उदघाटन केले. 'Amraa Studio Salons' असे शिव ठाकरेच्या सलोनचे नाव आहे. विशेष म्हणजे शिवनं स्वत:च्या सलूनचे उदघाटनसुद्धा लाडक्या आजीच्या हस्ते केले. त्याच्या या नवीन सलूनसाठी त्याला मराठी आणि हिंदी टीव्ही विश्वातल्या कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनीही अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुळचा अमरावतीचा असलेला शिव हा प्रसिद्धीच्या शिखरावर असताना मातीशी नाळ जोडून आहे. यामुळे चाहते त्याचं विशेष कौतुक करतात. शिवने बिग बॉसनंतर अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला. बिग बॉस हिंदी मध्येही तो झळकला. तिथे तो रनर अप होता.'खतरो के खिलाडी','रोडीज' मध्येही तो होता. बिग बॉस मराठीमध्ये असताना त्याचं वीणा जगतापसोबत अफेअर गाजलं. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. मधल्या काळात त्याचं डेजी शाहसोबत नाव जोडलं गेलं होतं.
Web Summary : Shiv Thakare launched his salon 'Amraa Studio Salons' in Amravati on Gudi Padwa, inaugurated by his grandmother. Celebrities and fans congratulated him on his new venture. Shiv, originally from Amravati, has participated in reality shows like Bigg Boss Marathi and Hindi, and Khatron Ke Khiladi.
Web Summary : शिव ठाकरे ने गुड़ी पड़वा पर अमरावती में 'अमरा स्टूडियो सैलून' नाम से अपना सैलून खोला, जिसका उद्घाटन उनकी दादी ने किया। सेलेब्रिटीज और प्रशंसकों ने उन्हें बधाई दी। मूल रूप से अमरावती के शिव ने बिग बॉस मराठी और हिंदी और खतरों के खिलाड़ी जैसे रियलिटी शो में भाग लिया है।