Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजीला गोव्याला घेऊन गेला शिव ठाकरे, बीचवर बिकिनीतल्या फॉरेनरला पाहून दिली अशी रिअ‍ॅक्शन; मजेशीर व्हिडीओ व्हायरल

By कोमल खांबे | Updated: May 13, 2026 10:45 IST

शिव आजीला सरप्राइज देण्यासाठी गोव्याला घेऊन गेला होता. शिवने याचा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. गोव्यामध्ये कुटुंबासह शिव एन्जॉय करताना दिसत आहे. 

शिव ठाकरे हा फॅमिली मॅन आहे. त्याचं आजीसोबतचं नातंही फार खास आहे. अनेकदा शिव त्याच्या आजीसोबतचे खास व्हिडीओ शेअर करत असतो. अनेकदा तो आजीला सरप्राइजही देतो. नुकतंच शिव आजीला सरप्राइज देण्यासाठी गोव्याला घेऊन गेला होता. शिवने याचा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. गोव्यामध्ये कुटुंबासह शिव एन्जॉय करताना दिसत आहे. 

व्हिडीओच्या सुरुवातीला दिसतंय की शिवची आजी विमानात सीट बेल्ट लावताना त्याची गाठ बांधत आहे. त्यानंतर एअरहॉस्टेस येते आणि त्यांना मदत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर शिव त्याच्या कुटुंबासोबत गोव्यातील बीचवर जातो. तिथे बिकिनीतील फॉरेनरला पाहून शिवची आजी, आई हसताना दिसत आहे. शिवने याचा व्हिडीओ शूट केला आहे. बिकिनीतील फॉरेनरला पाहून शिवच्या आजीला हसू अनावर झाल्याचं दिसत आहे. त्यानंतर त्याच्या आजीने त्या फॉरेनरसोबत बीचवर फोटोही काढल्याचं दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 


शिव ठाकरे हे कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. रिएलिटी शोमुळे शिवला ओळख मिळाली. 'रोडिज' या रिएलिटी शोमधून तो प्रसिद्धीझोतात आला. 'बिग बॉस मराठी २'चा विनर ठरल्यानंतर शिवला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर 'बिग बॉस हिंदी'मध्येही तो सहभागी झाला होता. अलिकडेच पार पडलेल्या 'द ५०' या शोचा देखील शिव विजेता ठरला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Thakare Takes Grandma to Goa; Beach Reaction Viral

Web Summary : Shiv Thakare surprised his grandmother with a Goa trip. A video shows her amusing reaction to foreigners in bikinis on the beach. She even posed for photos, delighting fans with her joyful spirit. Shiv's family bond shines.
टॅग्स :शीव ठाकरेटिव्ही कलाकार