Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शिंदेच्या ड्रेसवर होते चर्चा,काय आहे प्रकरण वाचा सविस्तर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 17:34 IST

सध्या फक्त बिग बॉस विनर शिल्पा शिंदेचीच चर्चा पाहायला मिळत आहे.शिल्पा 'बिग बॉस11'ची विजेती बनल्यापासून तिच्यावर अजुनही शुभेच्छांचा वर्षाव ...

सध्या फक्त बिग बॉस विनर शिल्पा शिंदेचीच चर्चा पाहायला मिळत आहे.शिल्पा 'बिग बॉस11'ची विजेती बनल्यापासून तिच्यावर अजुनही शुभेच्छांचा वर्षाव थांबता थांबत नाही.'बिग बॉस 11ची'विजेती होणारी शिल्पा ही पाचवी महिला कंटेस्टंट आहे.मात्र आता शिल्पा शिंदेमुळे किंग खान शाहरूखची मुलगी सुहाना खान सुद्धा पुन्हा चर्चेत आली आहे. आता शाहरूखची लेक सुहाना आणि शिल्पा शिंदेचा काय संबंध हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.सुहाना कोणत्या तिच्या बॉलिवूड डेब्युमुळे चर्चेत आली नाहीय.तर शिल्पा शिंदेमुळेच सुहाना सा-यांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.सध्या शिल्पा शिंदेचा एक फोटो व्हायरल होत आहे.बिग बॉस फिनालेचा हा फोटो असून या फोटोमुळे दोघींवर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे झाले असे की,बिग बॉसच्या फिनाले दरम्यान शिल्पाने गोल्डन कलरचा सुंदर गाऊन घातला होता.अगदी असाच मिळता जुळता गाऊन सुहानानेही एका कार्यक्रमा दरम्यान घातला होता.सुहानाने घातलेला ड्रेस हा शिल्पाच्या ड्रेसची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे.फोटोत दिसत असल्याप्रमाणे शिल्पा शिंदेचा ड्रेस सुहानाचा ड्रेस अगदी सेम टु सेम दिसत आहे.सध्या जान्हवी कपूर आणि सारा अली खान या दोघींच्या नावाप्रमाणे बॉलिवूडमध्ये सुहानाच्याही डेब्युची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच गौरी खाननं डिझाईन केलेल्या रेस्टॉरन्ट लॉन्चच्या वेळी सुहानाचा अंदाज पाहून कॅमे-यांसह उपस्थितांचीही नजर तिच्यावरुन हटत नव्हती.सुहानाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक नेटीझन्स संमिश्र प्रतिक्रीया देताना दिसले.अर्थात नेटीझन्सने सुहानाच्या ड्रेसिंग स्टाईलवरच प्रतिक्रीया देताना दिसले.त्यामुळे काहीही केल्या सुहानाची चर्चा थांबता थांबत नाहीय.cnxoldfiles/a>खरं तर संपूर्ण सीजनदरम्यानच सलमान शिल्पाच्या फेव्हरमध्ये असल्याचे दिसून आले. ब-याचदा सलमानला शिल्पाचे कौतुक करतानाही बघण्यात आले.अनेकदा तर त्याने शिल्पावरून इतर सदस्यांना फटकारलेही.दस्तुरखुद्द सलमानची आई सलमान खानची देखील शिल्पा फेव्हरेट होती.अशात सलमान शिल्पासाठी पुढे सरसावणार असेच स्पष्ट होत आहे.