Join us

शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 09:20 IST

शिल्पाने फोटो शेअर करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. तिने मुंबई पोलिसांना टॅग करत तक्रारही दाखल केली आहे.

९० च्या दशकातील लोकप्रिय आणि बिग बॉस १८ मुळे पुन्हा प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा (Shilpa Shirodkar)अपघात झाला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत तक्रार केली आहे. तिच्या कारला एका बसने धडक दिली. शिल्पाने फोटो शेअर करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. तिने मुंबई पोलिसांना टॅग करत तक्रारही दाखल केली आहे.

'सिटी फ्लो' या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी चालणाऱ्या बसने अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या कारल धडक दिली. शिल्पाने बस आणि कारचे फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आहेत. यासोबत ती लिहिते, "आज एका सिटी फ्लो बसने माझ्या कारला धडक दिली. सिटी फ्लो कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमध्ये संपर्क केला असता योगेश कदम आणि विलास मकोते यांनी जबाबदारी झटकली. ते घडलं ती ड्रायव्हरचीच जबाबदारी होती असं ते म्हणाले. किती निर्दयी लोक आहेत. ड्रायव्हर असा किती कमवत असेल?

ती पुढे लिहिते, "मुंबई पोलिसांचे आभार. कोणतीही अडचण न येता त्यांनी मला तक्रार देण्यासाठी मदत केली. पण बस कंपनीने मात्र जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी सिटी फ्लो कंपनीने मला संपर्क केला तर बरं होईल. सुदैवाने माझ्यासोबतचा स्टाफ सुरक्षित आहे त्यांना काहीही झालेलं नाही. मात्र काहीही घडू शकलं असतं."

शिल्पा शिरोडकर सध्या 'शंकर-रिव्होल्युशनरी मॅन' या आदि शं‍कराचार्यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. हा ओटीटी प्रोजेक्ट आहे. यामध्ये ती आदि शंकराचार्यांच्या आईच्या आर्यंबाच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :शिल्पा शिरोडकरकारअपघातमुंबई