Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शिंदेला विजेती घोषित करणे फिक्स होते; हिना खानच्या चाहत्यांनी केला आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 19:28 IST

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सीजन ११ ची विजेती म्हणून शिल्पा शिंदेला घोषित करण्यात ...

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सीजन ११ ची विजेती म्हणून शिल्पा शिंदेला घोषित करण्यात आले आहे. शोचा होस्ट सलमान खानने तिला विजेती घोषित करताना शोची ट्रॉफी तिला प्रदान केली. शिल्पाला ड्रामा क्वीन हिना खानला कडवी टक्कर द्यावी लागली. शोमध्ये हिनाला दुसºया स्थानी समाधान मानावे लागले. परंतु ही बाब हिनाच्या चाहत्यांना फारशी पचनी पडली नसल्याचे आता दिसून येत आहे. कारण एकीकडे शिल्पावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात असतानाच दुसरीकडे हिनाच्या चाहत्यांकडून तिच्यावर टीका केली जात आहे. हिनाच्या चाहत्यांच्या मते, हा शो फिक्स असून, शिल्पाला विजेती करण्यासाठी निर्मात्यांनीच प्रयत्न केले आहेत. रविवारी झालेल्या शोच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये हिनाने विकास गुप्ता आणि पुनीश शर्माला मागे टाकत शिल्पासोबत फायनलमध्ये स्थान मिळविले होते. जेव्हा सलमानने शिल्पाला विजेती घोषित केले तेव्हा त्याने म्हटले की, शिल्पाने हिनाला काही वोटच्या फरकानेच मात दिली आहे. त्यामुळे हिनाच्या चेहºयावरील दु:ख स्पष्टपणे दिसत होते. यावेळी सलमानने शिल्पाला विजेती ट्रॉफी देतानाच ४४ लाख रूपयांचा धनादेशही दिला. तेव्हापासून हिनाचे चाहते सोशल मीडियावर शोचा विनर फिक्स असल्याचे म्हणत आहे. ट्विटरवर तर चाहत्यांचा संताप खूपच दिसत असून, शिल्पालाही त्यांच्याकडून टार्गेट केले जात आहे.  तर काहींनी सलमान खानवरच पक्षपाताचा आरोप लावला आहे. त्यांच्या मते, सलमानमुळेच शिल्पाला शोची विजेती म्हणून घोषित करण्यात आले आहे. हिना खान स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षरा नावाची भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झाली. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यामुळेच तिच या शोची विजेती असायला हवी होती, असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. हिनाने बिग बॉसच्या घरात प्रत्येक टास्कमध्ये शंभर टक्के परफॉर्मन्स  केला आहे. त्यामुळे ती प्रेक्षकांची आवडती स्पर्धक होती. परंतु निर्मात्यांनी शिल्पाला विजेती घोषित करून शो फिक्स असल्याचे दाखवून दिले आहे.