Join us

आकाश ददलानीने शिल्पा शिंदेला बळजबरीने केले किस; प्रेक्षकांनी म्हटले, ‘घरातील महिला असुरक्षित’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 17:50 IST

आकाश ददलानी बिग बॉसच्या घरातील असा सदस्य आहे, जो नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. अर्थात त्याच्या या ...

आकाश ददलानी बिग बॉसच्या घरातील असा सदस्य आहे, जो नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. अर्थात त्याच्या या अतिउत्साहीपणाकडे घरातील अन्य सदस्य फारशे गांभीर्याने बघत नाही. मात्र यावेळेस त्याने जे कृत्य केले, त्यामुळे घरातील इतर सदस्यांनाच धक्का बसला नाही तर प्रेक्षकही चकित झाले. होय, त्याने शिल्पा शिंदेसोबत हे कृत्य केले. त्याने शिल्पाला बळजबरीने किस केल्याने शिल्पा चांगलीच संतापली. त्याचबरोबर शिल्पाचे चाहतेही आकाशच्या या कृत्यामुळे संतापले असून, घरात महिला सुरक्षित नसल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे. खरं तर आकाशला स्वत:वर नियंत्रण ठेवणे नेहमीच अवघड होत आहे. त्यामुळे त्याच्यातील उथळपणा घरातील अन्य सदस्य चांगल्या पद्धतीने जाणून आहेत. मात्र यावेळेस त्याने जे कृत्य केले ते खरोखरच धक्कादायक असल्याने प्रेक्षकांमध्ये संंताप व्यक्त केला जात आहे. त्याचे झाले असे की, पुनीश आणि आकाश चर्चा करीत होते. याठिकाणी शिल्पादेखील उभी होती. मात्र याचदरम्यान आकाश बळजबरीने शिल्पाला किस करतो. विशेष म्हणजे त्याठिकाणी असलेला पुनीश उभा राहून दोघांची गंमत बघत असतो. किस केल्यानंतर आकाश शिल्पाला म्हणतो की, ‘होय... काय करणार’ शिल्पा आकाशला उत्तर देताना म्हणते की, ‘तू खूप मार खाणार आहेस... तुला आता कानशिलात मारेल... मला तुझ्याशी बोलायचे नाही.’ दरम्यान, आकाशच्या उत्साहीपणाबद्दल बºयाचदा सलमान खाननेही फटकारले आहे. कारण आकाशने मित्र असलेल्या प्रत्येक सदस्याशी वाद घातला आहे. गेल्या काही आठवड्यांत त्याने पुनीशबरोबर चांगलाच वाद घातला आहे. सध्या तो अर्शी खानवर नाराज आहे. शिल्पा शिंदेला तर तो ‘मां’ म्हणून बोलावितो. मात्र शिल्पा आणि विकासची मैत्री त्याला खटकली अन् त्याने तिच्याशी वाद घातला. असो, आकाशच्या या कृत्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. काही प्रेक्षकांनी तर आपल्या भावना व्यक्त करताना सलमान खानने आकाशवर कारवाई करावी अन् लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तर काही प्रेक्षकांनी हिना खानला उद्देशून म्हटले की, तू शिल्पाचा तिरस्कार करतेस, परंतु आकाशने असे कृत्य तुझ्यासोबत केले असते तर कदाचित ते तू सहन करू शकली नसती. त्यामुळे आकाशसारखे स्पर्धक जोपर्यंत या शोमध्ये आहेत, तोपर्यंत घरातील महिला सुरक्षित नसल्याच्या प्रतिक्रियाही प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.