Join us
Daily Top 2Weekly Top 5

अँटी-एजिंग इंजेक्शनमुळेच झालं शेफाली जरीवालाचं निधन? ११ महिन्यांनंतर नवऱ्याने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 15:25 IST

शेफालीने खरंच अँटी एजिंग इंजेक्शन घेतलं होतं?

अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. इतकी सुंदर आणि फिट अभिनेत्री अचानक कशी गेली असा प्रश्न अनेकांना पडला. तिने अँटी एजिंगचं इंजेक्शन घेतलं होतं अशी नंतर चर्चा झाली. शेफालीच्या निधनानंतर ११ महिन्यांनी पती पराग त्यागीने या चर्चांवर मौन सोडलं आहे. यासह त्याने अनेक गोष्टींवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'फिल्मीग्यान'ला दिलेल्या मुलाखतीत पराग त्यागी म्हणाला, "शेफालीने कधीच डाएटिंग, गोरेपणासाठी अँटी एजिंग इंजेक्शन घेतले नाहीत.  लोकांना मी विनंती करतो की व्हॉट्सअॅप मेसेजेसवर विश्वास ठेवू नका.  आम्ही घरी नॉर्मल जेवायचो. पोळी, भाजी, डाळ-भात..प्रोटीन इनटेक जास्त असायचं पण बाकी सगळं नॉर्मल होतं. त्या वेळी खरं तर ती सर्वात जास्त फिट होती. आम्ही कुटुंबासोबत एकत्र जेवणाचा आस्वाद घ्यायचो. त्यामुळे या सगळ्या अफवा ऐकून मलाच हसू आलं."

तो पुढे म्हणाला, "आम्ही चायनीज खायचो, आईस्क्रीम खायचो. त्यामुळे भूक न लागणाऱ्या इंजेक्शनची गरजच नव्हती. प्लीज मला सांगा..जर तरुण दिसण्याचं असं खरंच प्रभावी इंजेक्शन असतं तर सगळ्यांनीच नसतं का घेतलं? आपल्या आईबाबांनाही लावलं असतं. आज रतन टाटाही जिवंत असले असते."

शेफाली जरीवालाचं २७ जून २०२५ रोजी निधन झालं. शेफालीच्या मृत्यूनंतर परागने आपले आयुष्य तिच्या आठवणीत समर्पित केले आहे. त्याने तिच्या आठवणीत युट्यूब चॅनेल आणि पॉडकास्ट सुरू केले आहे. शेफाली जरीवालाने २०१४ साली अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. लग्न करण्यापूर्वी दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या जोडप्याच्या लग्नाला ११ वर्षे झाली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shefali Jariwala's death: Husband denies anti-aging injection rumors after 11 months.

Web Summary : Parrag Tyagi, Shefali Jariwala's husband, has refuted rumors that anti-aging injections caused her death. He clarified she maintained a normal diet and lifestyle. He dismissed the claims as WhatsApp rumors and emphasized her fitness at the time of her passing in 2025, after 11 years of marriage.
टॅग्स :शेफाली जरीवालासेलिब्रिटी