Shefali Jariwala Death: काटा लगा गर्ल शेफाली जरीवालाचं शुक्रवारी(२७ जून) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अवघ्या ४२व्या वर्षी शेफालीचा मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. शेफालीचा मृत्यू किंवा तिला हृदयविकाराचा झटका नेमका कशामुळे आला, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शेफाली गेल्या काही वर्षांपासून अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत असल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला होता. तर आता तिच्या मैत्रिणीने नवा खुलासा केला आहे.
शेफालीने मृत्यूच्या दिवशी व्हिडामिन डीचं इंजेक्शन घेतल्याचं तिची मैत्रीण पूजा घई हिने सांगितलं आहे. विक्की ललवानीला दिलेल्या मुलाखतीत पूजाने याचा खुलासा केला आहे. शेफालीच्या अँटी एजिंग ट्रीटमेंटबद्दलही तिने भाष्य केलं. ती म्हणाली, "मला वाटतं कोणाच्या पर्सनल गोष्टी असं बोलणं योग्य नाही. मी दुबई राहते आणि एक अभिनेत्री आहे. मला याची कधीच गरज पडली नाही. सगळे जण या ट्रीटमेंट घेतात. हे खूपच कॉमन आहे. दुबईमध्ये तर क्लिनिक आणि सलूनमध्ये व्हिटामिन सी ड्रीप दिसतं. ती एक प्रोफेशन मध्ये होती. ती चांगलं काम करत होती. ती सुंदर दिसायची. शेवटच्या क्षणीही ती किती सुंदर दिसत होती. पण हे इंजेक्शन घातक नाहीत. फक्त तिच्यासाठी दिवस चांगला नव्हता".
"जसं मी म्हटलं की व्हिटामिन सी घेणं हे नॉर्मल आहे. काही जण हे रोज घेतात. कोव्हिड १९नंतर लोकांनी याचा वापर करणं सुरू केलं आहे. मी पण व्हिटामिन सी घेते. काही जण व्हिटामिन सीची गोळी खातात तर काही लोक IV ड्रिप घेतात. त्या दिवशी शेफालीने IV ड्रिप घेतली होती. मला ही गोष्ट माहीत आहे कारण जेव्हा मी तिच्या घरी होते तेव्हा पोलिसांनी त्या व्यक्तीला बोलवलं होतं ज्याने तिला IV ड्रिप दिलं होतं", असंही तिने सांगितलं.