अभिनेता शशांक केतकर सध्या स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेत अक्षयची भूमिका साकारत आहे. कामात व्यस्त असूनही तो आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत असतो. रस्त्यांवरील खड्डे असो वाहतूक कोंडी वा नागरी समस्या तो नेहमीच परखड मत मांडत असतो. शशांक केतकर सध्या एका वेगळ्याच व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. नेहमी प्रशासनावर ताशेरे ओढणाऱ्या शशांकने यावेळी मात्र सोशल मीडियावर एक 'हटके' व्हिडीओ शेअर करत वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी करणाऱ्यांची मिश्किल शब्दात फिरकी घेतली आहे.
शशांक शूटिंगसाठी जात असताना त्याला रस्त्यावर एक असा नजारा दिसला की त्याला व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरला नाही. त्याच्या गाडीच्या समोरून जाणाऱ्या एका स्कुटीवर चक्क पाच जण बिनधास्त प्रवास करत होते. दुचाकीवर केवळ दोघांनाच परवानगी असताना हा प्रवास पाहून शशांकने आपल्या खास शैलीत कमेंट केली.
व्हिडिओमध्ये शशांक म्हणतो, "काय तो रस्ता, काय ती हवा अन् काय तो आत्मविश्वास... लय भारी! एका गाडीवर पाच माणसं... आय लव्ह इट! असंच पाहिजे त्या गाडीला". शशांकने हा व्हिडीओ शेअर करताच त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. केवळ चाहतेच नाही तर अनेक मराठी कलाकारांनीही यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
एका युजरने लिहिले, "BMW वाला पण इतका आनंदी नसेल, हे लोक जीवनाचा खरा आनंद घेत आहेत". दुसऱ्याने म्हटले, "चालवणाऱ्याची खरी हिंमत आहे बुवा!". तर एकाने लिहिले, "म्हणतात ना 'इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स' तेच खरंय!"
Web Summary : Actor Shashank Ketkar, known for speaking out on social issues, shared a humorous video of five people riding a scooter. He sarcastically praised their confidence, sparking laughter and comments online from fans and Marathi celebrities alike. The video highlights blatant disregard for traffic rules.
Web Summary : अभिनेता शशांक केतकर, जो सामाजिक मुद्दों पर बोलने के लिए जाने जाते हैं, ने एक स्कूटर पर पांच लोगों की सवारी का एक हास्यपूर्ण वीडियो साझा किया। उन्होंने व्यंग्यात्मक रूप से उनके आत्मविश्वास की प्रशंसा की, जिससे प्रशंसकों और मराठी हस्तियों से ऑनलाइन हंसी और टिप्पणियां आईं। वीडियो यातायात नियमों की घोर अवहेलना को उजागर करता है।