Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मैं मायके चली जाऊंगी’ मधील नायकाचा लूक असणार शाहिद कपूरप्रमाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:00 IST

‘मैं मायके चली जाऊंगी’ या मालिकेत नमिश तनेजा प्रमुख नायकाच्या म्हणजेच समरच्या भूमिकेत दिसणार आहे. एका वेळी अनेक कामे करण्याची क्षमता असणारी ही व्यक्तिरेखा खूप समंजस आणि स्थिर देखील आहे

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील आगामी मालिका मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो एक नाट्यमय कॉमेडी आहे. आपले आगळेवेगळे कथानक आणि काही गंमतीशीर पात्रे यांच्या जोरावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ही मालिका सज्ज झाली आहे. या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या मालिकेत नमिश तनेजा प्रमुख नायकाच्या म्हणजेच समरच्या भूमिकेत दिसणार आहे. एका वेळी अनेक कामे करण्याची क्षमता असणारी ही व्यक्तिरेखा खूप समंजस आणि स्थिर देखील आहे. ही भूमिका नमिशने यापूर्वी टीव्ही वर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे.  

गंमत म्हणजे नमिशचा या मालिकेतील लुक जब वुई मेट या अत्यंत गाजलेल्या चित्रपटातील शाहिद कपूरच्या लुकसारखाच आहे. तसेच जब वुई मेट मधील शाहिद प्रमाणेच नमिश या मालिकेत अतिशय शांत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. समरचा या मालिकेतील लूक प्रेक्षकांना आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. शाहिद कपूर प्रमाणेच तो देखील ट्राउझर, शर्ट आणि वेस्ट कोट अशा वेशभूषेत दिसणार आहे. याविषयी नमिश तनेजा सांगतो, “शाहिद कपूर हा आजच्या पिढीचा एक अप्रतिम अभिनेता आहे. अभिनय हे त्याचे प्रेम आहे. त्यामुळे तो माझा आदर्श आहे. क्रिएटिव्ह टीमसोबत मी समरच्या लुकबाबत खूप चर्चा केली. मी जी व्यक्तिरेखा साकारत आहे, त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एक लुक ठरवला. हा लूक जब वी मेट मधल्या शाहिद कपूर सारखा आहे. समर हा एक अत्यंत आज्ञाधारक आणि आदर्श मुलगा आहे. तो शांत, रोमॅंटिक आणि सकारात्मक विचारसरणीचा माणूस आहे. जयावर त्याचे प्रेम आहे आणि तिच्या बाबतीत तो गंभीर आहे. मला खात्री आहे की, माझी पडद्यावरील समर ही व्यक्तिरेखा लोकांना आपलीशी वाटेल.”  

‘मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो’ ही मालिका ११ सप्टेंबर पासून प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार रात्री साडे आठ वाजता पाहायला मिळणार आहे.