Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PHOTO: 'छोटी बहू' फेम रूबीना दिलाइकने शेअर केला तिचा बिकनीलूक फोटो,सोशलमीडियावर उमटल्या संमिश्र प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 12:03 IST

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझच्या बॉयफ्रेंड एंड्र्यू निबोन याने तिची ही न्यूड छबी कॅमे-यात कैद केली होती.हाच फोटो ...

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझच्या बॉयफ्रेंड एंड्र्यू निबोन याने तिची ही न्यूड छबी कॅमे-यात कैद केली होती.हाच फोटो उत्तम फोटोग्राफी असल्याचे सांगत इलियानाने सोशलमीडियावर अपलोड केला होता. एलिनाने तिच्या बॉयफ्रेंडचे न्युड फोटोची खूप कौतुकही केले होते.असाचा प्रकार एका टीव्ही अभिनेत्रीनेच्या बॉयफ्रेंडनेही केला आहे. 'छोटी बहू' फेम  रुबीना दिलाइकने  इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे बिकनीत असलेले काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो रुबीनाचा बॉयफ्रेंड अभिनव शुक्लाने काढले असून हेच फोटो सोशलमीडियावर शेअर करत  रूबीनाने  बॉयफ्रेंड अभिनव शुक्लाचे भरभरून कौतुकही केले आहे.  छोट्या पडद्यार अगदी साडी वजनदार दागिने आणि संस्कारी बहू म्हणून भूमिका साकारणारी रूबीना सध्या खूप बोल्ड झाल्याचे पाहायला मिळतेय. यापूर्वीही रूबीनाने ग्लॅमरस फोटोशूट केले होते ते ही फोटो तिने तिच्या चाहत्यांसाठी सोशलमीडियावर शेअर केले होते. नेहमी साडीत दिसणारी रूबीनाचा ग्लॅमसर अंदाज पाहून तिच्या चाहत्यांकडूनही तिचे खूप कौतुक केले होते. पुन्हा एकदा रूबीनाने नवीन फोटोशूट केले आहे. त्यामुळे या फोटोमधला तिच्या घायाळ करणा-या अंदाजामुळे सोशलमीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतायेत. अभिनवपूर्वी रुबीचे टीव्ही अभिनेता अविनाश सचदेवसह अफेअर सुरू होते. 'छोटी बहू' मालिकेच्या सेटवरच दोघांची भेट झाली होती. मात्र काही कारणांमुळे त्यांचे नाते जास्त वेळ न राहता संपुष्टात आले. रुबीना आता 'शक्ति - अस्तित्व के एहसास' या मालिकेत सौम्याच्या भूमिकेत झळकतेय. यापूर्वी रुबीना 'सास बिना ससुराल','पुनर्विवाह','देवो के देव महादेव','जिनी और जूजू' या मालिकांमध्ये झळकली होती.सध्या अभिनव शुक्लासोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे  वेगवेगळ्या  कारणांमुळे ती सध्या चर्चेत आहे.