Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सावळ्यांची जणू सावली' मालिकेतील सावली थिरकली 'फिलिंग्स...'वर, डान्सचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:17 IST

Savalyanchi Janu Savali Serial: काही दिवसांपूर्वी प्राप्तीने 'पुष्पा २' सिनेमातील 'सामी..' गाण्यावर डान्स केला होता आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता तिने पुष्पा २ सिनेमातील फिलिंग्स या गाण्यावर डान्स केला आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'सावळ्याची जणू सावली' (Savalyachi Janu Sawali) मालिकेने अल्पावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील सावलीने आपल्या सोज्वळ, साधेपणा आणि प्रेमळ स्वभावाने रसिकांचे मन जिंकले आहे. या मालिकेत सावलीची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) हिने साकारली आहे. प्राप्तीला सावलीच्या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. ती खऱ्या आयुष्यात सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी प्राप्तीने 'पुष्पा २' सिनेमातील 'सामी..' गाण्यावर डान्स केला होता आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता तिने पुष्पा २ सिनेमातील फिलिंग्स या गाण्यावर डान्स केला आहे. तिच्या या डान्सला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. 

अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती 'पुष्पा २'मधील हिट गाणं 'फिलिंग्स...'वर थिरकताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. या व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

किती सांगायचंय मला या मालिकेतून अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने मालिका विश्वात पदार्पण केले. त्यानंतर तिने काव्यांजली मालिकेत काम केले. प्राप्तीने या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर सोनी वाहिनीवरील ‘मेरे साई’ या हिंदी मालिकेतही प्राप्ती दिसली होती. रज्जो ही भूमिका तिनं साकारली होती. सध्या ती 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत काम करताना दिसते आहे.