९०च्या दशकात दूरदर्शनवर आलेल्या 'श्री कृष्ण' या पौराणिक मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. 'श्री कृष्ण' मालिका रामानंद सागर यांनीच दिग्दर्शित केली होती. १९९३ ते १९९६ पर्यंत ही मालिका दूरदर्शनवर प्रक्षेपित झाली. २२१ भागांच्या या मालिकेचा प्रत्येक भाग ४५ मिनिटांचा होता. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे, यात भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता लोकांच्या मनात कायमचा कोरला गेला. त्या काळात प्रत्येक घरात टीव्ही नव्हता, त्यामुळे लोक इतरांच्या घरी जाऊन ही मालिका पाहायचे. श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये प्रेक्षक इतके रमून जायचे की, मालिकेतील कलाकारांना प्रत्यक्ष देवासारखं मानलं जायचं.
'श्री कृष्ण' या मालिकेत भगवान श्रीकृष्णाची भूमिका अभिनेते सर्वदमन डी. बॅनर्जी यांनी साकारली होती. त्यांनी साकारलेला कृष्ण इतका प्रभावी होता की आजही अनेकजण त्यांना कृष्णाच्या रूपातच आठवतात. सर्वदमन यांनी केवळ श्रीकृष्णच नव्हे, तर इतर अनेक पौराणिक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांनी आदि शंकराचार्य या चित्रपटात आदि शंकरांची भूमिका केली होती. याशिवाय श्री दत्त दर्शनम, स्वामी विवेकानंद, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी आणि गॉडफादर अशा चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे.
सध्या काय करतात?
९० च्या दशकात मोठं नाव कमावल्यानंतर सर्वदमन यांनी काही काळासाठी अभिनयातून ब्रेक घेतला. सध्या ते ऋषिकेश येथे योग शिकवतात. ग्लॅमरपासून दूर राहून ते साधं जीवन जगत असून, 'पंख' नावाच्या एका एनजीओलाही ते सपोर्ट करतात.
Web Summary : Sarvadaman D. Banerjee, famed for playing Krishna in Ramanand Sagar's series, left acting. Now, he teaches yoga in Rishikesh and supports an NGO, 'Pankh'.
Web Summary : रामानंद सागर की सीरीज 'श्री कृष्ण' में कृष्ण की भूमिका के लिए प्रसिद्ध सर्वदमन डी. बनर्जी ने अभिनय छोड़ दिया। अब वे ऋषिकेश में योग सिखाते हैं और 'पंख' नामक एक एनजीओ का समर्थन करते हैं।