Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यासाठी स्पेशल थंडगार समर ड्रींक, संकर्षण कऱ्हाडेने शेअर केली रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:49 IST

संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

फेब्रुवारी महिन्यातच उन्हामुळे अंगाची लाहीलाही होण्यास सुरुवात झाली आहे. अजून एप्रिल, मे महिना बाकी आहे. कडक उन्हात अनेकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवते. कधी पोटात आग पडते, कधी हातापायांची जळजळ होते, तर कधी पित्ताचा त्रास डोकं वर काढतो. अशा वेळी आपण थंडाव्यासाठी कोल्ड ड्रिंक्सकडे वळतो. पण अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने नुकताच एक असा घरगुती उपाय सांगितला आहे, जो खिशाला परवडणारा तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. संकर्षण कऱ्हाडेने चाहत्यांना उन्हाळ्यासाठी एक भन्नाट रेसिपी शेअर केली आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात संकर्षण म्हणाला, "हा कोणताही वैद्यकीय सल्ला नाही, पण मला हा उपाय खूप मानवतो. खूप तिखट खाल्ल्यावर किंवा जागरण झाल्यावर जेव्हा पोटात आग पडते, तेव्हा मी हे मिश्रण पितो". संकर्षणच्या मते, रात्री न जेवता केवळ हे मिश्रण पिऊन झोपलात तरी पोटात थंडावा राहतो. संकर्षणने ही रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली आहे.

 १. दूध: थोडे थंडगार दूध घ्यावे (तापवून गार केलेले किंवा न तापवलेलेही चालेल). २. प्रवाळयुक्त गुलकंद: दुधात एक चमचा प्रवाळयुक्त गुलकंद टाकावा.गुलकंद पोट शांत ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी असतो. ३. व्हॅनिला आइस्क्रीम: यात १० रुपयांची व्हॅनिला आइस्क्रीमची डबी घालावी. ४. फिनिशिंग टच: हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.

संकर्षणने हा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला. विशेष म्हणजे, एका आहारतज्ज्ञाने कमेंट करत लिहिले की, "गुलकंद ॲसिडीटी कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे, त्यामुळे ही रेसिपी नक्कीच उत्तम आहे". 

English
हिंदी सारांश
Web Title : Sankarshan Karhade shares special summer drink recipe for summer.

Web Summary : Actor Sankarshan Karhade shared a cooling summer drink recipe to combat heat. The simple recipe includes milk, gulkand, and vanilla ice cream. An expert confirmed gulkand's benefits for acidity.
टॅग्स :संकर्षण कऱ्हाडेसमर स्पेशल