Join us

समीर सोनीच्या 'या' इंटिमेट सीन्समुळे भडकली निलम कोठारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2017 12:17 IST

निलम कोठारीचे उद्योगपती ऋषी सेठीसोबत लग्न झाले होते. पण त्या दोघांमध्ये काहीच महिन्यात खटके उडाले आणि त्यांनी वेगळे होण्याचा ...

निलम कोठारीचे उद्योगपती ऋषी सेठीसोबत लग्न झाले होते. पण त्या दोघांमध्ये काहीच महिन्यात खटके उडाले आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वर्षांनी निलम अभिनेता समीर सोनीच्या प्रेमात पडली आणि त्या दोघांनी 2011मध्ये लग्न केले. त्यांनी लग्नानंतर दोन वर्षांनंतर एका मुलीला दत्तकदेखील घेतले. त्या दोघांची केमिस्ट्री खूपच चांगली असून त्यांचे एकमेकांसोबत खूपच पटते. अनेक कार्यक्रम, पुरस्कार सोहळा, पार्टी यांमध्ये त्या दोघांना नेहमीच एकत्र पाहिले जाते. पण या दोघांमध्ये आता चांगलीच भांडणे झाली असल्याचे म्हटले जात आहे.समीर सोनी सध्या बेवफा सी वफा या अल्ट बालाजीच्या एका वेबसिरिजमध्ये काम करत आहे. या बेवसिरिजमध्ये दीपानिता शर्मा आणि आदिती वासुदेव त्याच्यासोबत काम करत आहेत. या दोघींसोबत त्याने अनेक इंटिमेट सीन दिले असल्याने नीलम सध्या प्रचंड चिडली आहे. या वेबसिरिजची कथा विवाहबाह्य संबंधावर आधारित आहे आणि त्यामुळे यात समीर काही इंटिमेट सीन देणार असल्याची निलमला कल्पना होती. पण या बेवसिरिजचा प्रोमो पाहून तिला प्रचंड धक्का बसला आहे. दीपानिता आणि आदितीसोबत असलेल्या इंटिमेट सीनमुळे निलम समीरवर खूपच चिडली आहे. कोणत्याही मालिकेसाठी एवढे सीन देण्याची गरजच नव्हती असे तिचे म्हणणे आहे. पण यावर समीरने निलमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असून त्याने काही दृश्य वगळण्याची निर्मात्यांकडे विनंती केली आहे. पण समीर आणि निर्मात्यांचे बोलणे होण्याआधीच त्यांनी एपिसोड अॅपवर अपलोड केले असल्याने ते आता काहीही करू शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे समीर आणि निलम त्यांच्यातील वाद अद्याप तरी सुरूच आहे.