Join us
Daily Top 2Weekly Top 5

'संभाजी' मालिकेतील राणू अक्काचे ग्लॅमरस फोटो बनलेत चर्चेचा विषय, पहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 07:15 IST

अश्विनीने भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र आता ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत आलीय.

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 

अश्विनीनं नुकतंच फोटोशूट केलं. त्यातील काही फोटोंमध्ये ती खूप ग्लॅॅमरस दिसते आहे. तिने वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटोशूट केलेलं पहायला मिळतंय. 

अश्विनीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.

याबाबत अश्विनी म्हणाली की, मी लवकरच एका चित्रपटात काम करताना दिसणार आहे. खरंतर एखादी भूमिका कलाकाराला खूप काही देऊन जाते. राणूअक्का भूमिकेमुळे माझ्यासमोर अनेक दालनं खुली केली आहेत. या भूमिकेमुळे मला प्रेक्षकांचं व चाहत्यांचं खूप प्रेम मिळत आहे. कलाकारांचं प्रेम पुढील प्रवासासाठी प्रोत्साहन देणारे असते. यात बळावर मी माझा पुढील प्रवास सुरू ठेवला आहे.

अभिनयाशिवाय सामाजिक भान जपत अश्विनीने 'स्वराज्य परिपूर्ण किचन' हे हॉटेल नुकतेच मिरा रोड येथे सुरु केले आहे.

या हॉटेलमध्ये फक्त ४० रुपयांना थाळी मिळते. या स्वराज्य थाळीमध्ये दोन चपात्या, दोन प्रकारच्या भाज्या, वरण-भात, पापड, कोशिंबीर, एक गोड पदार्थ आणि ताक अशा स्वादिष्ट मेनूचा समावेश आहे. 

टॅग्स :स्वराज्य रक्षक संभाजीझी मराठी