Join us  

सलमान खानच्या बिग बॉसमध्ये शाहरुख खान करणार रईसचे प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2017 2:59 PM

बिग बॉसमध्ये चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कलाकारांनी उपस्थिती लावणे यात काही नवीन नाही. शाहरुखचा रईस हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होत ...

बिग बॉसमध्ये चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कलाकारांनी उपस्थिती लावणे यात काही नवीन नाही. शाहरुखचा रईस हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन त्याने सध्या सुरू केले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो बिग बॉसच्या घरातदेखील जाणार आहे. शाहरुख खान आणि सलमान खान यांनी करण अर्जुन, कुछ कुछ होता है यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. ते दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. पण आतापर्यंत दोन-तीन वेळा त्यांच्यात प्रचंड भांडणेदेखील झाली आहेत. ते दोघे कित्येक वर्षं एकमेकांचे तोंडही पाहात नव्हते. पण या सुपरस्टार्सना एकत्र पाहायला त्यांच्या फॅन्सना नेहमीच आवडते. बिग बॉसच्या नवव्या सिझनलादेखील ते दोघे एकत्र आले होते आणि आता दहाव्या सिझनलादेखील ते पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. बिग बॉसच्या फायनलच्या आधी सलमान आणि शाहरुख एकत्र येणार आहे. बिग बॉसच्या दोन भागांमध्ये शाहरुख रईसचे प्रमोशन करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ते या कार्यक्रमात रईस या चित्रपटाच्या गाण्यावर नृत्यदेखील करणार आहेत. बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये दिलवाले या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखने काजोलसोबत हजेरी लावली होती. दरम्यानच्या काळात शाहरुखचा डिअर जिंदगी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अलिया भट्ट आणि शाहरुख बिग बॉसमध्ये येणार असल्याची चर्चा होती. पण त्यावेळी शाहरुख काही कार्यक्रमात आला नाही. पण आता सलमानच्या बिग बॉसमध्ये शाहरुख येऊन मजामस्ती करणार आहे.