Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खान सोडणार बिग बॉस; जाणून घ्या त्यामागचे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 21:15 IST

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. त्याचा त्याच्या छबीवर वेळोवेळी परिणामही झाला आहे. मात्र ...

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. त्याचा त्याच्या छबीवर वेळोवेळी परिणामही झाला आहे. मात्र अशातही त्याच्यातील चांगुलपणा कधीच लपून राहिला नाही. ‘बिइंग ह्युमन’ या त्याच्या संस्थेच्या माध्यमातून त्याची सामाजिक नाळ कायम जोडले गेली आहे. सध्या सलमान बॉलिवूडमध्ये टॉपच्या स्थानावर असून, तो त्याची छबी जपण्याचा पुरेपुर प्रयत्न करीत असताना दिसतो. अशात बिग बॉस या कॉन्ट्रोव्हर्शल शोमुळे त्याच्या छबीवर परिणाम होत असल्याचे त्याला वाटत असल्याने तो हा शो सोडण्याच्या तयारीत आहे. टीव्ही जगातातील सर्वाधिक टीआरपी असलेल्या बिग बॉस या शोचे सलमानने लगातार ७ सिझन होस्ट केले आहेत. फक्त पाचवा सिझन त्याने संजूबाबा म्हणजेच संजय दत्त याच्याबरोबर होस्ट केला होता. सलमानमुळे या शोचा टीआरपीही वाढला असून, त्याचा शनिवार, रविवारचा वीकेण्ड का वॉर हा एपिसोड विशेष लोकप्रिय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉस हा शो सलमानचा फेव्हरेट असल्यानेच त्याने एकापाठोपाठ एक म्हणजेच सात सिझन होस्ट केले आहेत. परंतु या शोमुळे त्याची छबी घराब होत असल्याची त्याला आता जाणीव झाल्याने तो पुढच्या सिझनमध्ये हा शो होस्ट करताना दिसणार नसल्याचे बोलले जात आहे. बिग बॉस सिझन-१० हा सर्वच अंगांनी वादग्रस्त ठरला आहे. इंडियावाले विरुद्ध सेलिब्रेटी अशी थीम असलेल्या या सिझनमध्ये अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या आहेत. विशेषत: शोमधील कंटेस्टेंट प्रियंका जग्गा आणि स्वामी ओम यांनी केलेल्या कारणाम्यांमुळे शोच्या प्रतिमेलाच तडा गेला आहे. ही बाब सलमानच्याही लक्षात आल्याने त्याने दोनदा जाहिरपणे प्रेक्षकांची माफी मागितली आहे. विशेषत: लहान मुलांनी हा शो बघू नये, असे आवाहनच त्याने केले होते. तसेच मी या शोचा होस्ट असल्याचे वाईट वाटत असल्याचेही त्याने म्हटले होते. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, सलमानच्या ‘गुड बॉय इमेज’वर कसा परिणाम होत असून, पुन्हा त्याला ‘बॅड बॉय इमेज’ कशी प्राप्त होत आहे. मुळात ही बाब सलमानच्याच लक्षात आल्याने तो आता या शोमधून बाहेर पडू इच्छितो. खरं तर प्रत्येक सिझनमध्ये सलमान बिग बॉस शो सोडणार असल्याची चर्चा रंगत असते, मात्र अखेरीस चर्चा चर्चाच ठरते. त्यामुळे पुढच्या एपिसोडपासून तो या शो ला खरंच बाय बाय करणार काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. प्रतिएपिसोड ८ कोटी रुपयेबिग बॉसच्या दहाव्या सिझनमध्ये सलमान खान प्रतिएपिसोड तब्बल १० कोटी रुपये मानधन घेतो. वीकेण्ड का वॉर या एपिसोडमध्ये तो केवळ शनिवार-रविवार प्रेक्षकांना दिसत असतो. या एपिसोडमध्ये तो आठवडाभराचा लेखाजोखा घरातील सदस्यांसमोर मांडत असतो. शिवाय त्यांच्याकडून घडलेल्या काही चुकीच्या गोष्टींमुळे त्यांना फैलावर घेत असतो. सलमानचा बिग बॉस प्रवास बिग बॉस सिझन - ४होस्ट : सलमान खान विनर : श्वेता तिवारीप्राइज मनी : एक कोटी रुपयेदिवस : ९६ बिग बॉस सिझन -  ५होस्ट : सलमान खान, संजय दत्तविनर : जुही परमारप्राइज मनी : एक कोटी रुपयेदिवस : ९८बिग बॉस सिझन - ६होस्ट : सलमान खानविनर : उर्वशी ढोलकियाप्राइज मनी : ५० लाख रु पयेदिवस : ९७बिग बॉस सिझन - ७होस्ट : सलमान खानविनर : गौहर खानप्राइज मनी : ५० लाख रु पयेदिवस : १०५बिग बॉस सिझन - ८ होस्ट : सलमान खान विनर : गौतम गुलाटी प्राइज मनी : ५० लाख रु पये दिवस : १०५ एक्सटेंशन (हल्ला बोल) : २८ दिवस (फराह खान हिने होस्ट केले होते)बिग बॉस सिझन - ९ होस्ट : सलमान खानविनर : प्रिंस नरूलाप्राइज मनी : ३५ लाख रुपयेदिवस - १०५