Join us

सजन रे फिर झूठ मत बोलोमध्ये येणार हे वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 14:38 IST

सजन रे फिर झूठ मत बोलो ही मालिका गेली वर्षभर प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून या मालिकेत हुसेन कुवाजेरवाला, टिकू तलसानीया, शरद पोंक्षे, राखी विजन मुख्य भूमिकेत असून या सगळ्यांच्या भूमिका प्रेक्षकांना आवडत आहेत.

सोनी सब वाहिनीवरील “सजन रे फिर झूठ मत बोलो’’ ही मालिका सुरूवातीपासूनच फार मनोरंजक झाली असून या मालिकेने प्रेक्षकांना प्रचंड हसवले आहे. आगळेवेगळे कथानक आणि गुणवान कलाकार यांनी आपल्या विनोदबुद्धीने कायमच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ही मालिका गेली वर्षभर प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून या मालिकेत हुसेन कुवाजेरवाला, टिकू तलसानीया, शरद पोंक्षे, राखी विजन मुख्य भूमिकेत असून या सगळ्यांच्या भूमिका प्रेक्षकांना आवडत आहेत.गेल्या काही भागांमध्ये, चोप्रा यांच्या घरात राहणारा विजय (अभय प्रताप सिंग) हा चोर असल्याचे जाहीर झाल्यानंतर मालिकेत मोठे नाट्य निर्माण झाले आहे. हा विजय जयचा भाऊ असल्याचा समज चोप्रा कुटुंबियांचा झाला होता. दुसरीकडे या कुटुंबाची संपत्ती पाहून चोर पुन्हा घरी परतण्याचा निर्णय घेतो आणि जय आपल्या सासू-सासऱ्यांशी जे खोटे बोलत असतो, त्याचा फायदा घेण्याचेही हा चोर ठरवतो. सत्य कळल्यावर आणि चोराचा मूळ हेतू समजल्यानंतर जय (हुसेन कुवजेरवाला) त्याच्या कुटुंबियांसह चोराला घराबाहेर काढण्याचे आटोकाट प्रयत्न करतो. पण त्यांना यात यश येत नाही. घरात घुसलेल्या या भामट्यापासून सुटका करून घेण्यात जय आणि त्याच्या कुटुंबियांना यश येईल का... की, जयच्या सुंदर आयुष्यातल्या आणखी एका संकटाची ही केवळ एक नांदी ठरेल? मालिकेबाबत बोलताना जयचे पात्र वठवणारा हुसेन कुवाजेरवाला सांगतो, “ही मालिका अनेक विनोदी प्रसंगांनी भरलेली आहे. ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. येत्या काही भागांमध्ये समोर येणारे नाट्य प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल. आता आणखी एका अप्रिय प्रसंगापासून जय स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवू शकेल का, हे पाहण्यात खरी मजा येणार आहे.’’“सजन रे फिर झूठ मत बोलो’’ मालिकेच्या आगामी भागात अनेक वळणं येणार असून प्रेक्षकांना या आधीच्या भागांप्रमाणेच या मालिकेचे आगामी भाग देखील आवडतील अशी सगळ्यांना खात्री आहे.