'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत राणादाची भूमिका साकारून अभिनेता हार्दिक जोशी घराघरात पोहोचला. हार्दिकला पहिल्याच मालिकेने प्रसिद्धी मिळवून दिली. पण, त्याचा इंडस्ट्रीतला स्ट्रगल मोठा आहे. सुरुवातीला ठिकठिकाणी त्याने ऑडिशनही दिल्या होत्या. स्ट्रगलच्या काळात त्याला स्वत:ची बाईकही विकावी लागली होती. मात्र नंतर हार्दिकने त्याची तीच बाईक परत मिळवली. अभिनेता आणि हार्दिकचा मित्र असलेल्या ऋतुराज फडके याने याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
ऋतुराजने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन हार्दिक आणि त्याच्या बुलेटसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. पोस्टमध्ये तो म्हणतो, "हार्दिक जोशी आणि मी त्याच्या ह्याच बुलेटवरून ऑडिशन देण्यासाठी सेटवरती फिरायचो. तेव्हा घरून ऑडिशन पाठवा हा ट्रेंडच नव्हता, प्रत्येक शूटिंगच्या सेटवरती जाऊन दिग्दर्शकाला भेटणे, ऑडिशन देणे हा दिनक्रम आमच्या दोघांचा असायचा... स्ट्रगल सुरू असतानाच त्याला ती बुलेट विकावी लागली होती. पण एक दिवस मी पुन्हा हीच बुलेट घेईन असं सतत बोलायचा, मध्ये खूप वर्ष गेली... काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी गेलो असताना तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे असं म्हणाला आणि चक्क बुलेट दाखवली जी त्याच्या पार्किंगमध्ये उभी होती. परत आपण विकत घेतली, आमचा दोघांचा प्रवास डोळ्यासमोर पटकन आला... दोघेही हलके इमोशनल झालो".
ऋतुराजने केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. दरम्यान, ऋतुराजही लोकप्रिय अभिनेता आहे. मन उडू उडू झालं, मधु इथे आणि चंद्र तिथे मालिकेत तो दिसला होता. याशिवाय धर्मवीर २, छापा काटा या सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे. तर हार्दिक जोशीनेही काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. लवकरच तो नव्या प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
Web Summary : Actor Hardik Joshi, famed as 'Ranada,' repurchased the bullet bike he sold during his struggling days. His friend shared the emotional story of their shared auditions and Joshi's perseverance.
Web Summary : अभिनेता हार्दिक जोशी, जो 'राणादा' के नाम से प्रसिद्ध हैं, ने संघर्ष के दिनों में बेची गई बुलेट बाइक को फिर से खरीद लिया। उनके दोस्त ने उनके ऑडिशन और जोशी के दृढ़ संकल्प की भावनात्मक कहानी साझा की।