Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिला ओळखलंत का ? 'नांदा सौख्य भरे'मधील स्वानंदी आता दिसते इतकी ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 16:06 IST

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घालायला सुरूवात केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋतुजा बागवे नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका,आगामी प्रोजेक्टस यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. ऋतुजाने अलीकडेच तिचा एका फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. डोळे बंद करा एक दीर्घ श्वास घ्या या क्षणाचा आनंद घ्या. असे कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे. फोटोतील ऋतुजाचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. सोशल मीडियावर ऋतुजा तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घालायला सुरूवात केली आहे. 

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री ऋतुजा बागवे सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. विशेष म्हणजे 'नांदा सौख्य भरे' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री करत रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे. सध्या ती सुबोध भावेसोबत चंद्र आहे साक्षीला मालिकेत झळकते आहे.

टॅग्स :ऋतुजा बागवे