Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंदाना करिमीला झाली कोरोनो व्हायरसची लागण, अभिनेत्रीने स्वत: केला हा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 15:27 IST

अनेक सेलिब्रेटींनाही याची लागण झाली आहे.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे. रोज यांच्या रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होते आहे. कोरोना व्हायरसने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत. अनेक सेलिब्रेटींनाही याची लागण झाली आहे. याच दरम्यान बिग बॉस कंटेस्टेंट मंदाना करिमीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. मंदानाने या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिने याचे खंडन केले आहे. तिला डोळ्यांचे इन्फेक्शन झाले आहे. डॉक्टरांच्या मदतीने ती स्वत:ची काळजी घेते आहे.

घरातील साफ-सफाई करताना तिला हे इन्फेक्शन झाल्याची शक्यता आहे. मंदाना घरातील स्वच्छता करताना फॅन्स काळजी घेण्यास सांगितले आहे.

दाना करिमी 'बिग बॉसच्या 9' व्या सिझनमध्ये झळकली होती. बिग बॉसमध्ये येताच मंदाना करीमीला तुफान पब्लिसिटी मिळाली.क्या कुल है हम 3’ सिनेमामधून मंदानाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र सिनेमाला फारसे यश मिळाले नाही. तसेच तिला बॉलीवूडमध्ये पाहिजे तशा खास संधीही मिळाल्या नाहीत. तुर्तास तिचे बोल्ड फोटो आणि व्हीडीओ पाहून सोशल मीडियावर पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा अशाच कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या