Join us
Daily Top 2Weekly Top 5

"इंजिनियर्स अत्यंत वाईट रोमान्स करतात...", 'पती पत्नी और पंगा' जिंकल्यानंतर रुबिना दिलैकने केलेलं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:22 IST

रुबिना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला हे 'पती पत्नी और पंगा' या शोचे विजेते ठरले. पण, विजेता ठरल्यानंतर मात्र रुबिनाने असं काही वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

'पती पत्नी और पंगा' या कलर्स टीव्हीवरील रिएलिटी शोचा महाअंतिम भाग नुकताच पार पडला. या शोमध्ये सेलिब्रिटी जोड्या सहभागी झाल्या होत्या. यापैकी रुबिना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला हे 'पती पत्नी और पंगा' या शोचे विजेते ठरले. पण, विजेता ठरल्यानंतर मात्र रुबिनाने असं काही वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

रुबिनाचा पती अभिनव हा पेशाने इंजिनियर आहे. 'पती पत्नी और पंगा' शो जिंकल्यानंतर रुबिनाने इंजिनिअर्स वाईट पद्धतीचा रोमान्स करतात, असं म्हटलं आहे. रुबिना आणि अभिनवने 'सर्वगुण संपन्न जोडी'चा खिताब नावावर केल्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "धमाल विथ पती पत्नी और पंगा हा शो आमच्यासाठी एकत्र वेळ घालवण्याचा उत्तम पर्याय ठरला. या शोमुळे आयुष्याची धावपळ थोडा वेळ थांबली आणि एकमेकांना आम्हाला वेळ देता आला.  एक जोडपं म्हणून आम्ही परफेक्ट नाही, आणि इतर जोडप्यांप्रमाणेच आम्ही आमच्या कमतरतांबद्दल खूप प्रामाणिक होतो आणि त्या मोकळेपणाने सांगितल्यादेखील. ही ट्रॉफी जिंकणं आमच्यासाठी खूप खास आहे. हे आम्हाला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आहे. सोनाली मॅडम आणि मुनाव्वर यांच्या प्रेम, सौजन्य, विनोद आणि मार्गदर्शनाबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत". 

त्यानंतर रुबिना अभिनवला मजेशीरपणे म्हणाली की "इंजिनियर्स हे अत्यंत वाईट पद्धतीने रोमान्स करतात". अभिनेत्रीचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. रुबिना दिलैक आणि अभिनव यांनी २०१८ मध्ये लग्न केलं होतं. ते दोघं बिग बॉसमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा त्यांच्या नात्यात बिनसलं होतं आणि घटस्फोट घेणार असल्याचा खुलासा त्यांनी बिग बॉसच्या घरात केला होता. पण, बिग बॉस या शोने त्यांच्या नात्याला वेगळं वळण मिळालं आणि नंतर त्यांनी घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन जुळ्या मुली आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Engineers Romance Badly: Rubina Dilaik's Statement After Winning 'Pati Patni'

Web Summary : Rubina Dilaik and Abhinav Shukla won 'Pati Patni aur Panga'. Rubina jokingly said engineer Abhinav romances poorly. The couple, who almost divorced, reconciled on Bigg Boss and are now parents to twins.
टॅग्स :टिव्ही कलाकार