टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकने २०२३ साली जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यांचं नाव जीवा आणि ईधा असं ठेवण्यात आलं. लेकींच्या जन्मानंतर रुबिनाचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळेच थक्क झाले होते. काही महिन्यातच ती अगदी स्लिम दिसायला लागली. मात्र रुबिनाने नुकतंच सीझर डिलीवरीच्या वेदना किती जास्त असतात यावर भाष्य केलं.
'मिस मालिनी'ला दिलेल्या मुलाखतीत रुबिना दिलैक म्हणाली, "सी सेक्शनला लोक अगदीच कमी समजतात. पण सीझर करताना पोटावरचे ७ थर कापले जातात आणि १० मिनिटात बाळाला बाहेर काढलं जातं. त्यानंतर पुन्हा टाके घालायला ४५ मिनिटे लागतात. या प्रक्रियेत १ ते दीड लीटर रक्त जातं."
ती पुढे म्हणाली, "मी आता खतरो के खिलाडी शोमध्ये सहभागी होणार आहे. तिकडे जाण्याआधी काही मेडिकल टेस्ट होतात. त्यात डॉक्टरांनी मला अशात कोणती सर्जरी तर झाली नाही ना? असा प्रश्न विचारला. तेव्हा मला सांगायला जरा संकोच वाटत होता. मी त्यांना विचारलं की, 'तुम्ही सी सेक्शनला सर्जरी समजता का?' हे ऐकून त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाले, 'हो नक्कीच'. मग मी त्यांना अडीच वर्षांपूर्वी सी सेक्शन झालंय असं सांगितलं."
"लोकांना वाटतं सी सेक्शन म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही. पण माझं शरीर कशातून गेलंय हे मला माहित आहे. मी जेव्हा याबद्दल मोकळेपणाने बोलते तेव्हा लोक म्हणतात की यात काय एवढं? तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये गेलात आणि परत आलात. ही काही मोठी गोष्ट नाही.", असंही ती म्हणाली.
Web Summary : Rubina Dilaik, who delivered twins via C-section, criticizes the downplaying of its severity. She highlights the extensive surgery and recovery, recounting a doctor's surprise at her considering it significant. Dilaik emphasizes the physical toll and invalidation she faced.
Web Summary : जुड़वां बच्चों को सी-सेक्शन से जन्म देने वाली रुबीना दिलैक ने इसकी गंभीरता को कम आंकने की आलोचना की। उन्होंने व्यापक सर्जरी और रिकवरी पर प्रकाश डाला, और एक डॉक्टर के आश्चर्य का वर्णन किया। दिलैक ने शारीरिक कष्ट और अमान्यता पर जोर दिया।