Join us
Daily Top 2Weekly Top 5

​झी टीव्हीवरील इश्क सुभान अल्ला मध्ये पियुष सचदेव दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 11:48 IST

ट्रिपल तलाकच्या समस्येवर प्रकाशझोत टाकणारी झी टीव्हीवरील नवीन मालिका इश्क सुभान अल्ला प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकत आहे. या मालिकेमध्ये ...

ट्रिपल तलाकच्या समस्येवर प्रकाशझोत टाकणारी झी टीव्हीवरील नवीन मालिका इश्क सुभान अल्ला प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकत आहे. या मालिकेमध्ये स्वतंत्र विचारांची आधुनिक स्त्री झारा म्हणजेच इशा सिंग आणि कर्मठ पारंपरिक विचारांचा कबीर म्हणजेच अदनान खान यांचा निकाह झाला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. जसजशी इश्क सुभान अल्ला या मालिकेची कथा पुढे सरकेल, तशा प्रेक्षकांना या मालिकेत अनेक नवीन व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहेत. आता या मालिकेत सिराज या व्यक्तिरेखेची एंट्री होणार असून या सिराजच्या प्रवेशामुळे मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार आहे. या मालिकेत सिराज ही व्यक्तिरेखा पियुष सचदेव साकारणार आहे.इश्क सुभान अल्ला या मालिकेत नुकताच प्रेक्षकांना झारा आणि कबीर यांचा निकाह पाहायला मिळाला होता. आता कबीर आणि झारा मधुचंद्रासाठी काश्मिरला जाणार असून तिथे गेल्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडणार आहेत. कबीर आणि झारा यांच्यात सगळे काही सुरळीत सुरू असतानाच काही अनाकलनीय घटनांमुळे झाराची भेट अंडरवर्ल्ड डॉन सिराजसोबत होणार आहे. सिराज हा मूळचा काश्मिरचा असून तो कुख्यात गुंड आहे. आपल्या या व्यक्तिरेखेविषयी पियुष सचदेव सांगतो, “चित्रीकरणाकडे पुन्हा वळण्याचा हा संपूर्ण अनुभव मला खूपच आवडत आहे. पुन्हा काम करण्याचा उत्साह अतुलनीय आहे. सिराजची व्यक्तिरेखा गडद आणि गुंतागुंतीची असून त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक प्रकारचे रहस्यसुद्धा आहे. एका गुप्त कामगिरीवर असताना सिराजची झारासोबत भेट होते आणि तिला पाहाताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडतो. झाराचे लक्ष वेधून घेण्याच्या त्याच्या इच्छेमुळे झारा आणि कबीर यांच्या नात्यात गुंतागुंत निर्माण होते. मी झी टीव्हीसोबत काम करत असल्याने सध्या खूपच खूश आहे. प्रेक्षकांना इश्क सुभान अल्ला या मालिकेतील माझी भूमिका प्रचंड आवडेल अशी मला आशा आहे.”सिराज कबीर आणि झारा यांच्या नात्यात समस्या निर्माण करू शकणार की नाही हे प्रेक्षकांना इश्क सुभान अल्लाच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहे. Also Read : इश्क सुभान अल्ला या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी या कारणाने त्रस्त झाला होता अदनान खान