Join us
Daily Top 2Weekly Top 5

"प्रेक्षक मनावर घेतात यातच...", पाचव्या सीझनमध्ये झालेल्या ट्रोलिंगवर रितेश देशमुखने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:15 IST

या सीझनमध्ये काय वेगळं करणार? रितेश म्हणाला...

'बिग बॉस मराठी ६'चं दार लवकरच उघडणार आहे. लाडका भाऊ रितेश देशमुखच याही वेळी सीझन होस्ट करणार आहे. ११ जानेवारी रोजी बिग बॉस मराठी ३६ चा प्रीमियर होणार आहे. रितेश देशमुखने पाचव्या सीझनपासून होस्टिंगला सुरुवात केली. पहिल्याच सीझनवेळी त्याला प्रेक्षकांनी खूप ट्रोल केलं होतं. त्याला स्पर्धकांना नीट रागवताही येत नाही अशा कमेंट्सही आल्या होत्या. आता पुन्हा तो नवीन सीझन होस्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान त्याने गेल्या सीझनला झालेल्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच या सीझनमध्ये काय करणार नाही असं ठरवलंय यावरही त्याने उत्तर दिलं आहे. 

अल्ट्रा बझला दिलेल्या मुलाखतीत रितेश देशमुख ट्रोलिंगवर म्हणाला, "साधी गोष्ट आहे की प्रत्येकजण बिग बॉस आपल्या परीने पाहत असतो. प्रत्येकाला वाटत असतं की अरे हा मुद्दा नाही उचलला, तो नाही घेतला. पण जे घडतंय ते प्रेक्षक एवढं वैयक्तिक स्तरावर घेत आहेत हे शोसाठी उलट चांगलंच आहे. त्यामुळे मला जर ट्रोल करत असतील तरी मला वाईट वाटत नाही. मला याचा आनंद असतो की त्यांनी शो किती स्वत:च्या मनावर घेतला आहे. त्यांना शो किती आवडतोय किंवा ते त्यात किती गुंतले आहेत हे यातून दिसतं."

तो पुढे म्हणाला, "ते जर ट्रोल करत असतील तर याचा अर्थ हे बिग बॉस शोचं हे यशच आहे. बिग बॉस शो म्हणून प्रेक्षकांना इतकं गुंतवून ठेवू शकला. काही लोकांना वाटतं की मी असं रिअॅक्ट करायला हवं होतं किंवा तसं करायला हवं होतं, पण ते त्यांचं मत आहे आणि ते मांडूच शकतात. पण माझंही एक मत आहे आणि ते मी मांडणार. लोक काय बोलतायेत याची मला कल्पना असते पण सगळ्याच प्रतिक्रिया काही मी वाचत नाही.  शेवटी ट्रोलिंग हे कामाचाच भाग आहे. ते एवढं डोक्यावर घ्यायची गरज वाटत नाही."

या सीझनला काय वेगळा प्रयत्न करणार? यावर रितेश म्हणाला, "यावेळी मी थोडा जास्त रिलॅक्स राहीन. पहिल्यांदा मी बिग बॉस होस्ट करत होतो, स्पर्धकांना भेटलो होतो तेव्हा मला आठवतंय जरा दडपण नाही पण वेगळं काहीतरी करणार होतो. पण आता सगळं माहित आहे त्यामुळे जरा सोपं वाटतंय. म्हणून मी जरा रिलॅक्स असेन."

English
हिंदी सारांश
Web Title : Ritesh Deshmukh addresses trolling on first season of Bigg Boss.

Web Summary : Ritesh Deshmukh will host Bigg Boss Marathi 6, premiering January 11. He addressed past trolling, viewing it positively as audience engagement. He plans to be more relaxed this season, understanding that criticism is part of the job.
टॅग्स :रितेश देशमुखमराठी अभिनेताबिग बॉस मराठी ६