Join us

"तू सगळ्यांना मिठी का मारतेस?", चहलच्या Ex पत्नीसाठी अरबाज होतोय पझेसिव्ह, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 17:32 IST

'राइज अँड फॉल'मधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अरबाज धनश्रीबद्दल पझेसिव्ह होत असल्याचं दिसत आहे.

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची एक्स पत्नी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मा 'राइज अँड फॉल' या रिएलिटी शोमुळे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर धनश्रीने या रिएलिटी शोमध्ये एन्ट्री घेतली. 'राइज अँड फॉल' धनश्रीसोबत अर्जुन बिजलानी, आदित्य नारायण, अनाया बांगर, अरबाज पटेल, किकू शारदा, पवन सिंह हे स्पर्धक सहभागी झाले आहेत. सुरुवातीला तिची भोजपुरी अभिनेता पवन सिंहसोबत चांगली मैत्री झाली होती. मात्र पवन सिंह शोमधून बाहेर पडल्यानंतर आता धनश्री आणि अरबाज पटेलमध्ये मैत्री वाढत असल्याचं दिसत आहे. 

'राइज अँड फॉल'मधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अरबाज धनश्रीबद्दल पझेसिव्ह होत असल्याचं दिसत आहे. तो धनश्रीला विचारतो की "तू सगळ्यांना जाऊन मिठी का मारतेस?". त्यावर धनश्री त्याला "कोणाला?" असं विचारते. मग अरबाज म्हणतो की "आरुष, अर्जुन, बालीला...". मग धनश्री अरबाजला उत्तर देते की मी सगळ्यांनाच मिठी मारते. त्यावर अरबाज तिला म्हणतो की तू साइड हग (बाजूने मिठी) करू शकतेस. मग धनश्री त्यावर रिप्लाय देते की "मी कधीच कोणालाच साइड हग करत नाही". या व्हिडीओमुळे दोघेही ट्रोल होत आहेत. 

अरबाज पटेल बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आला होता. बिग बॉसमध्ये अरबाज आणि निक्कीची जवळीक वाढली होती. बाहेर आल्यानंतरही ते एकमेकांना डेट करत असून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे अरबाज धनश्रीबाबत पझेसिव्ह होताना पाहून चाहते भडकले आहेत. तर धनश्रीलाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. अरबाज आणि धनश्रीमध्ये खरंच जवळीक वाढली आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकार