Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे वैशाली माडेने इंडियन आयडल या कार्यक्रमात लावली हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 12:55 IST

पहिल्या भागात या सत्रातील सर्वोत्कृष्ट १४ स्पर्धक सहभागी असतील. या कार्यक्रमात या स्पर्धकांना प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी त्यांच्यासोबत संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकार येणार असून त्यामुळे हा कार्यक्रम अधिकच रंजक बनणार आहे.

भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक रिअॅलिटी शो इंडियन आयडल १० चा भव्य प्रिमियर २८ आणि २९ जुलै रोजी रात्री आठ वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर होणार आहे. टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांसाठी या वीकएंडला ही एक सांगीतिक मेजवानीच असणार आहे. पहिल्या भागात या सत्रातील सर्वोत्कृष्ट १४ स्पर्धक सहभागी असतील. या कार्यक्रमात या स्पर्धकांना प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी त्यांच्यासोबत संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकार येणार असून त्यामुळे हा कार्यक्रम अधिकच रंजक बनणार आहे.

या मान्यवर कलाकारांमधील एक नाव आहे वैशाली माडेचे, जी मुंबईच्या अवंती पटेलला पाठिंबा देण्यासाठी आली होती. अवंतीने ‘पिंगा पोरी’ हे गाणे गात सेटवर उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. वैशाली माडे तिच्या परफॉर्मन्सने इतकी प्रभावित झाली की, ती मंचावर आली आणि तिच्यासोबत पुन्हा तिने ते गीत गायले. वैशाली आणि अवंती यांनी प्रेक्षक आणि परीक्षक यांच्यासाठी पुन्हा पिंगा गाणे गाऊन सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.

वैशाली माडे आपला अनुभव शेअर करताना सांगते, “हा कार्यक्रम मी खूप वर्षांपासून पाहते आहे. इंडियन आयडल हा त्या काळातला कार्यक्रम आहे, जेव्हा मला तर हे देखील माहीत नव्हते की, रिअॅलिटी शो म्हणजे काय असते. हा त्या सर्वात जुन्या कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमाचा असा इतिहास आहे की, जो कोणी या मंचावर येतो, तो स्वतःसाठी एक उच्च परिमाण सेट करतो. आज मी या कार्यक्रमात दोन राज्यांना पाठिंबा देत आहे... महाराष्ट्र आणि गुजरात. मी अवंती पटेलचे समर्थन करणार आहे आणि ती जितकी महाराष्ट्रीयन आहे तितकीच गुजराती देखील. ती एक अनुभवी आणि प्रतिभाशाली गायिका आहे. तिला पाठिंबा देताना मला आनंद होत आहे.”

इंडियन आयडल हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचे प्रत्येक सिझन आजवर गाजले असून या सिझनने एकापेक्षा एक गुणी गायक चित्रपटसृष्टीला दिले आहेत.