Join us

​या कारणामुळे कुल्फी कुमार बाजेवाला फेम अंजली आनंदने घरातील कामवाल्या बाईला कामावरून टाकले काढून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 16:14 IST

अभिनेत्री अंजली आनंद सध्या स्टार प्लसवरील दैनंदिन मालिका कुल्फी कुमार बाजेवालामध्ये लव्हलीची भूमिका साकारत असून नुकतेच तिने आपल्या घरातील ...

अभिनेत्री अंजली आनंद सध्या स्टार प्लसवरील दैनंदिन मालिका कुल्फी कुमार बाजेवालामध्ये लव्हलीची भूमिका साकारत असून नुकतेच तिने आपल्या घरातील कामवाल्या बाईला कामावरून काढले आहे. तिने तिच्या कामवाल्या बाईला का काढून टाकले त्यामागे एक खास कारण आहे आणि हेच कारण अंजलीने नुकतेच सगळ्यांसोबत शेअर केले आहे. अंजली आपल्या फिटनेस आणि व्यायामाला अतिशय गंभीरपणे घेते. पण जिमला जाण्यापेक्षा तिला जुन्या पद्धतींनी शारीरिक व्यायाम करायला अधिक आवडतो. त्यामुळे ती रोज न चुकता चालते. आपल्या फिटनेसबद्दल ती सांगते, “मला फिट राहायला आवडतं. माझे चीट मील्स देखील असतात. पण मग ते मी व्यायामाने भरून काढते. मी चालायला जाते आणि आता मी घरची कामे करायला सुरुवात केली आहे. कारण मला वाटतं तो व्यायामाचा उत्तम प्रकार आहे. त्यामुळे मग मी माझ्या बाईला कामावरून काढले असून घरची सगळी कामे सध्या मी करते आहे. माझ्या चालण्याबद्दल मी अतिशय कडक आहे आणि मी हेड स्टॅन्ड आणि हॅन्ड स्टॅन्डही करू शकते.”‘कुल्फीकुमार बाजेवाला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांवर प्रेक्षक खुश आहेत. त्यात लव्हली आणि सिकंदर या व्यक्तिरेखा अनुक्रमे अंजली आनंद आणि मोहित मलिक साकारत आहेत. मालिकेत या दोन कलाकारांमध्ये पती-पत्नीचे नाते असले तरी त्यांचे एकमेकांशी पटत नसल्याचे मालिकेत दाखविण्यात आले आहे.कुल्फी ही अतिशय आनंदी, स्वच्छंदी, मिश्किल आणि निरागस स्वभावाची, सदा हसतमुख असणारी मुलगी आहे. आपल्या आवडत्या सलवार-कुर्ता, स्पोर्टस शूज आणि केसांची छानशी बांधलेली पोनी टेल अशा अवतारात कुल्फी आपल्या गावातील गल्लीबोळांतून नव्या गोष्टींचा शोध घेत फिरताना दिसत आहे. आपल्या पहिल्याच प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून तर घेतलेल्या कुल्फीकुमार बाजेवाला मालिकेत एका मुलीच्या संगीतमय जीवन प्रवासाची कहाणी सादर करण्यात आली आहे. कुल्फी (आकृती शर्मा) आपल्या मित्रमैत्रिणींना आणि इतर लोकांना नेहमी गाणी गाऊन दाखवते असे मालिकेत दाखवण्यात आले आहे.Also Read : कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेसाठी मोहित मलिक गिरवतोय गायनाचे धडे!