Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे एरिका फर्नांडिसची श्वेता तिवारीसह होते तुलना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 07:15 IST

एरिका फर्नांडिस 2012 साली मिस इंडियाची स्पर्धक आहे. त्यानंतर तिने मॅाडेलिंगला सुरूवात केली. आता अभिनयाच्या क्षेत्रातही छोट्या पडद्यावर 'कुछ रंग प्यार के' मालिकेच्या निमित्ताने तिची एंट्री धमाकेदार ठरली.

एकता कपूर लवकरच 'कसौटी जिंदगी की २' रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या मालिकेतून, एरिका फर्नांडिस पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. या आधी एरिका 'कुछ रंग प्यार के ऐसे' भी मालिकेत झळकली होती. त्यानंतर आता प्रेरणा बनत एरिका नव्या अंदाजात रसिकांच्या समोर येणार आहे. तब्बल 18 वर्षांनी ही सुपरहिट ठरलेली मालिका पुन्हा प्रसारित होणार आहे. इतक्या गाजलेल्या मालिकेत प्रेरणा शर्मा ही प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे एरिका फर्नांडिस खूप खुश आहे. एरिका सोशल मीडीयावर खूप अॅक्टीव्ह असते. वेळोवेळी सोशल मीडियावरुन तिचे फोटो शेअर करत असते. तिचे हेच फोटो पाहून तिची तुलना श्वेता तिवारीसह केली जात आहे. तुलना कधीही कोणाशीही होऊ नये.प्रत्येकाची काम करण्याची पद्धत असते. तुलना करुन एखाद्याच्या कामाला कमी दाखवल्यासारखं होतं. त्यामुळं श्वेता तिवारीसह तुलना होणं योग्य नाही असेही तिने म्हटले आहे. एरिका सांगते, “ही भूमिका मिळाल्यामुळे मला जो आनंद झाला आहे. तो शब्दात व्यक्त करणं अशक्यच आहे. माझी व्यक्तिरेखा परिपूर्ण दिसली पाहिजे आणि त्यासाठी मी माझ्या लूकवर बारकाईनं काम करणार आहे. माझे केवळ कपडेच नव्हे, तर माझी रंगभूषा आणि केशभूषेवरही मी माझ्या स्टायलिस्टला भरपूर सूचना देत असते. या भूमिकेला मला स्वत:च्या आवडीनुसार नवीन लूक द्यायला होता. म्हणून माझ्या कपड्यांच्या रंगांची आणि माझी केशभूषा कशी असेल,त्याची निवड मीच केली. या शिवाय मी स्वत:च माझी रंगभूषाही करीत असते कारण मला प्रेरणाच्या भूमिकेला 100 टक्के न्याय द्यायचा आहे.”एरिका  या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळाले. तिने वर्कआऊट करत वजनही कमी केले आहे. 

विशेष म्हणजे एरिका 2012 साली मिस इंडियाची स्पर्धक आहे. त्यानंतर तिने मॅाडेलिंगला सुरूवात केली. आता अभिनयाच्या क्षेत्रातही छोट्या पडद्यावर 'कुछ रंग प्यार के' मालिकेच्या निमित्ताने तिची एंट्री धमाकेदार ठरली. सोनाक्षी ही भूमिका तिने साकारली होती. मालिकेत नेहमी पारंपारिक वेशभूषेत दिसणारी एरिका तिच्या खाजगी आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. तिचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमुळे तिच्या चाहत्यांच्याही संख्येत वाढ होत आहे.