Join us
Daily Top 2Weekly Top 5

​या कारणामुळे अस्ताद काळेने बदलली त्याची हेअरस्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 10:28 IST

अस्ताद काळे सरस्वती या मालिकेत राघव ही भूमिका साकारत असून त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या ...

अस्ताद काळे सरस्वती या मालिकेत राघव ही भूमिका साकारत असून त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील त्याची आणि सरस्वतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावते. अस्ताद गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्याने अग्निहोत्र, पुढचे पाऊल यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्याने चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये देखील काम केले आहे. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता अस्ताद एका वेगळ्या गोष्टीकडे वळणार आहे.
अस्तादने त्याच्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या मालिकांना, त्यामधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतले आहे. पण आता अस्ताद एका रिअॅलिटी शोमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. बिग बॉस या कार्यक्रमाच्या यशानंतर बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या बिग बॉसच्या घरात आता मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज दिसणार आहेत. अस्ताद देखील बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचा भाग असणार असल्याची चर्चा आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी अस्तादने त्याचा लूक बदललेला आहे. अस्तादने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच त्याचा नव्या लूकमधील फोटो पोस्ट केला असून मी ही स्टाईल तब्बल १७ वर्षांनी केली असल्याचे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. स्पाईक कट केलेला अस्ताद या फोटोत खूपच छान दिसत आहे. त्याच्या फॅन्सना देखील त्याचा हा लूक प्रचंड आवडत आहे. त्याच्या फॅन्सने या फोटोवर खूप साऱ्या लाईक्स दिल्या असून अनेकांनी या फोटोवर कमेंट केले आहे. तू या स्टाईलमध्ये खूप छान दिसत आहेस... तसेच बिग बॉसमध्ये तुला पाहायला आम्हाला नक्कीच आवडेल अशाप्रकारच्या कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.
बिग बॉसमध्ये अस्ताद झळकत असल्याने सरस्वती या मालिकेतून त्याची लवकरच एक्झिट होणार आहे. सरस्वती मालिकेतील राघव ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याने ते त्यांच्या लाडक्या राघवला खूप मिस करणार यात काही शंकाच नाही.